शेख अन्सार प्रतिनिधी
रिसोड
महाराष्ट्र मध्ये राजकीय भूकंप झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी आता राजकीय नेत्यांचा खरपूस समाचार घेतला असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात राजकारणात अजित पवार यांनी आपल्या आमदारासह सत्तेमध्ये शपथविधी घेतल्यानंतर याबाबत कुठे तिखट तर कुठे गोड प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे समर्थक याला एक चांगला निर्णय असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला समजवण्याचा प्रयत्न करीत आहे तर मात्र सामान्य जनतेकडून याबाबत अत्यंत तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. काही जुने फोटो जुने व्हिडिओ अपलोड करून राजकीय पुढार्यांना आरसा दाखवल्या जात आहे. काही नेटकऱ्यांनी अत्यंत संताप व्यक्त करत असून सामान्य मतदाराची काही किंमत राहिली नसल्याचा राग व्यक्त करत आहे. तर अनेकांनी याबाबत मात्र चांगलाच खरपूस समाचार घेतला असल्याचे दिसत आहे. आज दुपारपासून तर रात्रीपर्यंत सोशल मीडियावर जणू प्रतिक्रियांचा पाऊसच झाला आहे. काही नेटकरी कार्यकर्त्यांबद्दल विनोद करून आता कार्यकर्त्यांना काही कळत नसल्याचं दाखवत आहे तर विरोधी पक्ष हे पुढाऱ्यांचे जुने व्हिडिओ समोर करून त्यांना त्यांच्या वक्तव्याची आठवण करून देत आहे.
अशा व्यक्त केल्या जात आहे प्रतिक्रिया
निवडणूक आयोगांना विनंती आहे की पुढच्या वेळेस आमच्या बोटेला शाई लावण्याऐवजी चुना लावावा
सासू मुळे वाटणी केली आणि सासुच वाट्याला आली
कार्यकर्त्यांना काय, कोणी कुठेही जाओ आपले काम सतरंज्या उचलणे आहे तेवढे तर आम्ही करणारच
महाराष्ट्रात एकाही मतदाराचे मत वाया गेलं नाही ज्याला ज्याला मतदान केलं त्यांनी सरकार बनवलं
तीन वर्षात काँग्रेस शिवसेना भाजप राष्ट्रवादी सर्वच पक्ष सत्तेत. महाराष्ट्रातील जनतेला मूर्खात काढण्यात सर्व राजकारणी यशस्वी झाले.
तीन चाकाचा सरकार म्हणून दोन चाकावर आलं .आणि पुन्हा आता एकदा तीन चाकावर आला चालू द्या तुमचं.
कार्यकर्ते अत्यंत टेन्शनमध्ये दिसत आहे,कारण आपण ज्याचे भोंगे बांधले तेच दुसऱ्या पक्षात पळून गेले आता करावं तरी काय.
आजच्या या राजकारणातून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की आपण जेही कार्यकर्ते कोणतेही पक्षाशी असाल ते एकमेकांना कडवट भाषेत बोलण्यापेक्षा प्रेमाने बोललेले कितीही चांगले
डबल इंजिन सरकार आता ट्रिपल इंजिन झालं आहे, महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार
नेमकं ज्यांचं चिन्ह इंजिन आहे त्यांना सोडून सगळ्यांचे इंजिन धावत आहेत... ईश्वरा इतका कसा निर्दयी आहेस रे...!
चला पुन्हा एकदा बेरोजगार राजकीय लोकांना संधी उपलब्ध होणार
जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष इत्यादी जागा नव्याने निर्माण झाल्यात त्याची नियुक्ती ची पत्रे तयार आहेत फक्त नाव टाकणे बाकी
चला उठा वीर हो