वर्षावास उद्घाटन कार्यक्रमला उपस्थित राहावे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा वाशिम यांचे आव्हान



वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर

वाशिम ; २  भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा वाशिम यांच्या मार्फत वर्षावास , धम्म ग्रंथवाचन कार्यक्रमाचे उद्घाटन आषाढपौर्णीमेला सोमवारी  दि.०३/७/२३ ला वेळ दुपारी १२ वाजता  आनंद बुद्ध विहार अकोला नाका वाशिम येथे होणार आहे.या दरम्यान काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुध्दा होणार आहे.

    दरवर्षी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा मार्फत धम्म ग्रंथवाचन व इतर ग्रंथ वाचन वर्षावास काळात करित असते. ह्या करिता भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल , कार्यकर्ते, केंद्रीय शिक्षक , शिक्षीका, विचारवंत बांधव सहभाग घेऊन गावोगावी जाऊन मार्गदर्शन करित असतात. 

  ह्या वर्षी सुध्दा अशाच प्रकारचा उपक्रम राबविल्या जात आहे. ज्यांना विषय घेऊन मार्गदर्शन करण्यासाठी गावोगावी जाणार आहे. त्यांना विषय दिल्या जाणार आहेत. प्रबोधनाच्या माध्यमातून समाज बांधवांना  योग्य प्रकारे मार्गदर्शन लाभणार असून  गावोगावी ग्रंथ वाचन वर्षावास कार्यक्रम सुरू करावा .प्रवचना करिता भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. बैठकीत काही विषयांवर महत्वपूर्ण चर्चा करण्यात येणार असून काही अडचणी असतील,सुचना असतील तर ते बैठकीत सादर कराव्या त्याचा सारासार विचार करून निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती 

देवानंद वाकोडे - सरचिटणीस वाशिम यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post