सिकलसेल वाहक व ग्रस्त रुग्णांना जिल्हा रुग्णालयातर्फे कार्डचे वितरण
वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर
वाशिम: राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन मोहिमेचे उद्घााटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दुरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. त्यानुषंगाने वाशीम जिल्हा रुग्णालयात सिकलसेल वाहक व ग्रस्त रुग्णांची तपासणी करून त्यांना कार्डचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विजय काळबांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धम्मपाल खेळकर, RMO डॉ. पराग राठोड, रक्तपेढी प्रमुख प्रकाश मोरे, सिकलसेल जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम ईंगोले, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सोनल मिश्रा समुपदेशक राजकुमार पवार यांच्यासह सिकलसेल रुग्णांची उपस्थिती होती. दरम्यान, २०४७ पर्यंत भारताला सिकलसेल आजाराचे निर्मूलन करायचे असून आरोग्य यंत्रणेने सर्वोतपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सिकलसेल रुग्णाना पंतप्रधानांनी समुपदेशन करून या अनुवंशिक आजाराचे निर्मूलन करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या आरोग्य यंत्रणेच्या कार्याचे पंतप्रधानानी कौतुक केले. वाशीम जिल्ह्यात सिकलसेल आजाराचे १८३७ वाहक तर सिकलसेल ग्रस्त १६४ रुग्ण असून यावर उपचार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यासाठी वाशीम जिल्हा रुग्णालयात आधुनिक यंत्र सामग्रीने विशेष कक्ष निर्माणाधीन असून अधिकाधिक रुग्णाना याचा लाभ मिळत आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.विजय काळबांडे यांनी दिली.
