आषाढ गुरू पौर्णिमे निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे वृक्षारोपण




वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर


वाशीम ; ३ जुलै ,स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे वाशिम करांच्या वतीने वृक्षारोपण  करण्यात आले.

  यावेळी सर्व प्रथम तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्ती जवळ उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत माधव डोंगरदिवे यांनी वंदना घेतली.नंतर तथागत गौतम यांच्या मुर्ती ला पुष्प अर्पण केले. नंतर गोपाळराव आटोटे गुरुजी व धम्मसेविका प्रतिभाताई सोनोने यांनी विविध जातींच्या वृक्षांचे वृक्षारोपण केले. भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, बबनराव खिल्लारे, दौलतराव हिवराळे, राजकुमार पडघान, खडसे ताई, कांबळे ताई, गंगाधर पडघान, मधुकर अंभोरे,वनिता सिरसाट, संगीता इंगोले, यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी गोपाळराव आटोटे गुरुजी यांनी गुरू पौर्णिमा विषयी सविस्तर माहिती दिली.याचवेळी सिद्धार्थ गायकवाड, संगीता इंगोले यांनीही मनोगत व्यक्त केले.कारेक्रमाचे सुत्रसंचलन राजकुमार पडघान यांनी केले तर आभार प्रदर्शन माधव डोंगरदिवे यांनी मानले. कार्येक्रमाला बहूसंख्येने उपासक व उपासिका यांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post