कोंडाळा महाली येथील प्रा.नरेश चव्हाण यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार जाहीर.





 ४ जुलै रोजी अमरावती येथे होणार पुरस्कार प्रदान


वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर


वाशिम ; ३ जुलै,  तालुक्यातील कोंडाळा महाली येथील स्व. कु. अर्चनाताई चव्हाण कला वाणिज्य व श्री.मनोहरराव नाईक विज्ञान महाविद्यालयातील केंद्र संयोजक प्रा.नरेश चव्हाण यांना उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार 2023 नुकताच जाहीर झाला आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत अभ्यास केंद्र स्व.कु.अर्चनाताई चव्हाण कला,वाणिज्य व श्री मनोहरराव नाईक विज्ञान महाविद्यालय कोंडाळा महाली येथील केंद्र संयोजक प्रा.नरेश चव्हाण यांना वाशिम जिल्हा या संवर्गातून उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार 2023 देण्याचे ठरले आहे,


यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय स्तरावर अमरावती येथे आयोजित त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत मुक्त विद्यापीठाचे विभागीय केंद्र अमरावती येथील सभागृहात पुरस्कार सोहळा दिनांक 4 जुलै २०२३ रोजी आयोजित केला आहे.

संस्थांतर्गत सुरू असलेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्राचे तसेच ज्ञानगंगा घरोघरी पोहोचविण्याचे कार्य या माध्यमातून करीत आहे

ग्रामीण भागामध्ये एकमेव असलेले अभ्यास केंद्रामध्ये दरवर्षी बीए,बी.कॉम,बालसंगोपन,


एम.ए (मराठी,इंग्रजी ,अर्थशास्त्र) तसेच एम.कॉम व एम.बी.ए या शिक्षणक्रमासाठी भरपूर विद्यार्थी प्रविष्ट होत असतात ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत बहुतांश विद्यार्थ्यांना या मुक्त विद्यापीठाचा फायदा झालेला असून नोकरी व पदोन्नती मिळालेली आहे.

यामध्ये केंद्र संयोजक प्रा. नरेश चव्हाण यांची मेहनत जिद्द चिकाटी व प्रेमळ स्वभावाच्या बळावर त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेत मुक्त विद्यापीठाने त्यांना उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार 2023  देण्याचे ठरविले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल संस्थेचे सचिव व्ही.एस.चव्हाण यांनी अभिनंदन केले असून ग्रामीण भागामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच वाशिम जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे.

Post a Comment

Previous Post Next Post