शहरातील पाटणी चौकातील रस्त्यावरील मांडलेल्या दुकानदारांचे साहित्य केले जप्त..
मागील महिन्यामध्ये नव्याने न.प सीओ यांनी अतिक्रमणावर चढविले होते बुलडोजर...
सरसकट केली होती कारवाई..
नव्याने रुजू झालेले नगरपरिषद CO हे परत अतिक्रमण मुक्त वाशिम करतील का.
वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर
वाशिम प्रतिनिधी ; वाशीमध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमण करून नागरिक व्यवसाय करतात. तर शहरातील दुकानदार व्यापारी हे देखील आपल्या दुकानासमोरील आपल्या मालाची विक्री करत आहेत. यामुळे नागरिकांना ग्राहकांना व इतर सर्व सामान्य व्यक्तींना या अतिक्रमणामुळे जागेची कमी भासत असून गर्दी झाल्यामुळे बाजारातील पाटणी चौक भागामध्ये व इतरही ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाशिम करांनी मोकळा श्वास घ्यावा याकरिता मागील महिन्यामध्ये वाशिम येथे नव्याने नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार ज्यांनी स्वीकारला होता. अशा पी.एस मिन्नू मॅडम यांनी वाशीम ९ जून पासून येथे सरसकट कारवाई करून अतिक्रमण धारकांच्या दुकानावरती अतिक्रमणावरती बुलडोजर जे सी बी मशीन लावून त्यांचे अतिक्रमण हटविले व रस्त्यावरील साहित्य हे गोळा करून जप्त केले. यामध्ये वाशिम शहरांमध्येच नव्हे तर संपूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये ही अतिक्रम हटाव मोहीम राबविण्यात आली होती. पि एस मिन्नु या कार्याचे सर्वत्र कौतुक होत होते. परंतु त्यांचा कार्यकाळ हा काही दिवसाचा असल्यामुळे तो संपून गेला...
आणि काही दिवस ओलांडले.. आता वाशिम नगरपरिषद ला नव्याने रुजू झालेली मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओ) श्री. गायकवाड यांनी आपला पदभार स्वीकारला आणि वाशिम शहरातील आज दिनांक १० जुलै रोजी सायंकाळी ६ :०० वाजताच्या सुमारास वाशिम शहरातील मुख्य पाटणी चौक भागांमध्ये सर्व नगरपरिषद कर्मचारी आणि काही दिवसा पूर्वी पोलीस यंत्रणेमध्ये नव्याने वाशिम येथे रुजू झालेले dysp पोलीस उपाधीक्षक श्री.मोहिते, आय एस आय अधिकारी अपूर्वा बासर मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलीस अधिकारी आरटीओ अधिकारी,क्यू आर टी पथक, नगरपरिषद अधिकारी,कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. वाशिम शहरातील पाटणी चौक या मुख्य भागांमध्ये पाहणी करून विक्रेत्यांना दुकानदारांना आपले अतिक्रमण काढून घ्यावे अन्यथा कारवाई करण्यात येईल अशी सूचना यावेळी त्यांनी दिल्या आहेत. यावेळी अनेक दुकानदारांचे रस्त्यावरील मांडलेले साहित्य नगरपरिषद च्या कर्मचाऱ्यांनी जप्त केले.


