प्रतिनिधी नितीन बोराडे
घाटकोपर मुंबई: रविवार दिनांक ९/०७/२०२३ रोजी श्री. मधुकर भिकु हेदुलकर घाटकोपर यांच्या निवासस्थानी . श्री संत गाडगे बाबा परीट सेवा महिला मंडळ यांची सभा घेण्यात आली प्रथम श्री संत गाडगेबाबा प्रतिमेच पुजन व बाबांचे भजन "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" घेण्यात आले. तसेच ज्ञात समाजबांधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली घाटकोपर-विक्रोळी-जोगेश्वरी विभागातील समाजातील सर्व महिलांनी एकत्र येऊन आपल्या विचारांची देवाण घेवाण करुन सामाजिक बांधिलकी म्हणून विभागात महिला मंडळ असावा या हेतूने प्रेरित होऊन महिला मंडळाची स्थापना करण्यात आली आहे मंडळाच्या उपसचिव सौ.श्रुती हेमंत शितप ह्यांनी मागील सभेचे इतिवृत्तात वाचन केले. त्यावर उपस्थितांची मंजुरी घेण्यात आली मंडळाच्या पुढील वाटचालीसाठी सर्व उपस्थित महिलांनी.आपआपली मते व्यक्त केली दर महिन्याला मंडळाची सभा घेण्यात यावी दीपावली नंतर एखाद्या कार्यक्रमाचे. नियोजन करण्यासाठी प्रयत्न करावयाचा आहे असे सर्वांनमते ठरविण्यात आले तसेच मासिक वर्गणी १००रुपये काढण्याचे ठरले आहे मंडळाच्या अध्यक्षा सौ. ममता मधुकर हेदुळकर यांनी सांगितले कि मंडळाच्या उत्कर्षासाठी व मंडळाचे नाव उज्वल ’ करण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्वाचे आहे.
,, सभेला उपस्थित काही महिलांनी आपल्या येणाऱ्या काही अडचणी बाबत विचारणा केली त्यांना समजेल असे उत्तम मार्गदर्शन अध्यक्षा यांनी दिले सभेला महिला पदाधिकारी उपस्थित होते
अध्यक्ष. सौ ममता मधुकर हेदुलकर.,सचिव सौ.अंजली अनिल कळंबे.,उपसचिव सौ.श्रुती हेमंत शीतप,उपखजिनदार. सौ. रुचिरा रघुनाथ येलकर सल्लागार.सौ.भारती मनोहर पालशेतकर.,कार्याध्यक्ष. सौ.वैशाली रवींद्र कळंबे. आणि सौ.प्रतीक्षा प्रवीण येलकर,कार्यकारणी सदस्य सौ.कल्पना काशीनाथ येलकर.,सौ.दिपाली दत्ताराम कदम,सौ.राजश्री राजेश पंदिरकर,सौ.अलका एकनाथ येलकर,श्रीमती. शेवंती मारुती सुर्वे,श्रीमती. निता नितिन येलकर,सौ. विशाखा नीलेश गायकवाड, कु.दामिनी दत्ताराम कदम. यांची उपस्थिती होती. सर्व उपस्थित महिलांचे आभार मानून सभेची सांगता करण्यात आली.
