मालेगाव येथे य.च.सैनिक शाळेत हरित सेनेद्वारा वृक्षारोपण




मालेगाव : उमेश लहाने 



सुपखेला स्थानिक यशवंतराव चव्हाण सैनिक शाळा सुपखेला येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय हरित सेनेद्वारा वृक्षरोपण उपक्रम राबविण्यात आला.

       राष्ट्रीय हरित सेनेने ठरवून दिलेले उद्दिष्टे साध्य करण्याकरिता यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेत दरवर्षी निसर्गास पूरक असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. या माध्यमातून निसर्गातील इतर सजीव घटकांचे संवर्धन व संरक्षण करण्याचे अमूल्य संस्कार विद्यार्थ्यांच्या मनात रुजविला जातो. सध्या अनुभवत असलेल्या हवामान बदलाने आपण मनुष्यच नव्हे ,तर पशुपक्षी सुद्धा अडचणीत येत आहेत.त्यासाठी करावयाच्या उपाययोजना मनुष्याने साजरी करावयाची सण,धार्मिक विधी व सामाजिक सोहळे किंवा कार्यक्रम पर्यावरण पूरक असले पाहिजेत. जेणेकरून निसर्गातील हवामान प्रजनन व तापमान संतुलित ठेवण्यास मदत होईल आणि म्हणूनच शाळेतील राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक शिक्षक  एम.एन.वानखडे .एस.एस. मोळके बि.वी.देशमुख . एन. ए  .पडघान .आर.ए.सरनाईक 

या शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात. नाविन्यपूर्ण कल्पनेतून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हरित सेनेच्या उपक्रमात सहभागी करून घेत असतात.

             शाळेचे प्राचार्य .एम.एस. भोयर त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .  यावेळी  शाळेचे कमांडंट कर्नल पी.पी.ठाकरे तथा एस.बी.चव्हाण,  ए.ए.गवळी तसेच वर्ग 10 अ विद्यार्थी आणि राष्ट्रीय हरित सेनेचे सदस्य उपस्थित होते.असे प्रसिद्धी प्रमुख रमेश रावसिंग पडवाळ यांनी कळविले.

Post a Comment

Previous Post Next Post