कर्जत प्रतिनिधी:- दिलीप अनारसे
कर्जत तालुक्यातील बहीरोबावाडी गावातील ग्रामस्थांनी देश सेवा करुन परत मायदेशी आलेल्या माजी सैनिकांचा सप्तनिक सन्मान व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच बहीरोबावाडीचे सुपुत्र सुधीर शांतिलाल रानमाळ मेजर यांचा भारतीय सेनेतुन सेवावृत्त झाल्याबद्दल सेवापुर्ती सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्याच बरोबर तालुक्यातील नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले होते.
संपूर्ण गावातुन कर्जत तालुक्यातील सर्व माजी सैनिकांचा भारतीय संस्कृती प्रमाणे भरजरी फेटा बांधून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रमुख संदीप लगड त्रिदल सौनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य
या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले कॅप्टन आंधळे बाळासाहेब
त्रिदल अहमदनगर अध्यक्ष, सुभेदार हरीभाऊ त्रिंबके उपाध्यक्ष, मेजर टि,डी, शिंदे, सुभेदार विनायक मोराळे, मेजर बाजीराव गोपालहारे, भांबरे प्रकाश काळे, सुभेदार युवराज जगताप बारामती, सुनील पवार,
यावेळी भाऊसाहेब रानमाळ मेजर जिल्हाध्यक्ष अहमदनगर त्रिदल सौनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य, रामेश्वर तोरडमल, दिपक यादव,अरुण लाळगे,आप्पा काळे, सुनील काका यादव, अशोक खेडकर, राम आण्णा तोरडमल, भाऊसाहेब तोरडमल, दिपक शिंदे, विजु काका तोरडमल, सुरेश काका तोरडमल, अनिल यादव, भिमा तोरडमल, आदी मान्यवर उपस्थित होते.
सरकार कोणाचेही पण असो देशसेवा करणार्या सैनिकांचा आदर करा. तसेच देश सेवा करणार्या सैनिकांचा व शेतात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची आठवण मात्र करायला विसरू नका असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप लगड यांनी कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते.
पुढे ते बोलत होते आर्मी चा जवान चोवीस तास सेवा करतो म्हणून. त्यासाठी सर्व गावची एकता पाहुण भाराऊन गेलो.
देश सेवा करणे त्यांच्या इतका भाग्यवान दुसरा कोणी नाही.
कार्यक्रमाचे बहारदार सुत्र संचालन विठ्ठल तोरडमल सर यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अॅड.रानमाळ यांनी मानले.
