प्रतिनिधी अन्सार शेख
रिसोड : शहरातील अहेबाबनगर या भागा मध्ये विद्युत महामंडळा करून विद्युत पुरवठा केला जात आहे परंतु विद्युत पोल वरुन विद्युत तार तेथे राहणा-या नागरिकांच्या अगदी घरावरुन गेल्यामुळे त्यांचे जिवन धोक्यात आले आहे.त्या विद्युत तारेच्या पोलामुळे खुप त्रास सहन करावे लागत आहे काल दिनांक 4 रोजी एका मजुराला काम करतावेळेस विजेचा करंट लागुन त्याची प्रकृति अत्यंत गंभीर झाली आहे त्याला औरंगाबाद येथे दवाखाण्यात रेफर करण्यात आले . विद्युत म रिसोड शहर व तालुक्याच्या वतीने उपविभागीय कार्यकारी अभियंता रिसोड यांना निवेदन देण्यात आले आहे लवकरात लवकर विद्युत तार नागरिकांच्या घरावरुन हटविण्यात यावे व दुसरी पर्यायी व्यवस्था करावी अन्यथा एम आय एम पक्षाच्या वतीने विद्युत कार्यालया समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळेस तालुका अध्यक्ष वसीम खान पठान,शहर अध्यक्ष मोहम्मद आसिफ, जियाउर खान जब्बार खान,सय्यद नाजिम (युथ शहर अध्यक्ष)रफीक शाह, शोएब शाह व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.
