कर्जत मध्ये न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पालक मेळाव्याचे आयोजन...



कर्जत प्रतिनिधी:- दिलीप अनारसे 

कर्जत तालुक्यातील अंबिजळगाव मधील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. काही पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.


विद्यार्थ्यांना शाळेत रोज पाठवण्याचे काम करत सहकार्य करावे आपला विद्यार्थ्याथी घडवण्यासाठी प्रयत्नशील राहु असे प्रतिपादन परदेशी सर यांनी कार्यक्रमाच्या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

  मुलांपेक्षा पालकांनी सक्षम असणे गरजेचे आहे. मुलांना मित्र बनवुन त्यांच्याकडुन अभ्यास करून घ्या.

  यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे  प्राचार्य भुजबळ आर के, हे होते.तर कार्यक्रमाचे प्रमुख माजी, प्राचार्य दत्तात्रय भांडवलकर, माजी, प्राचार्य, गाढवे हरिश्चंद्र, शेगुड माळंगी डोंबाळवाडी चे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन नागनाथ आप्पा बेरगळ, कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती नानासाहेब निकत,विद्यालयाचे प्राचार्य भुजबळ आर के, जेष्ठ नागरिक शिवाजी दादा निकत, माजी सरपंच राहुल अनारसे, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम निकत, कांतीलाल लोंढे, निंबे गावचे विद्यमान सरपंच बाळासाहेब कोपनर, सामाजिक कार्यकर्ते अनिल निकत,माता पालक मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 मुलांना शिक्षणा शिवाय शेती करणे सुद्धा अपुर्ण आहे.मुलांना घडवायचे असेल तर आपली झॅरोक्स स्वच्छ ठेवा प्रिंट नक्कीच सुंदर निघेल :- माजी सभापती नानासाहेब निकत, आपल्या मुलांकडून काही अपेक्षा ठेवायच्या असतील तर घरातील टि,व्ही, मुलांच्या अभ्यासाच्या वेळी बंद ठेवण्यात यावे असे ते बोलत होते.

    मुलांना शंभर टक्के घडवण्यासाठी शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक स्टाफ सक्षम राहतील.विद्याथ्याबरोबर शिक्षकांना सारखेच नियम राहतील.मुलींच्या सुरक्षिततेसाठी सर्वजण एकत्र येऊन काम केले जाईल. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य भुजबळ आर के यांनी पालकांना विश्वास देला आहे.

 कार्यक्रमाचे आभार ह भ प नारायण महाराज रासकर यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post