आमदार बच्चु कडु यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील मुलांना शालेय साहित्याचे व खाऊ वाटप....



कर्जत प्रतिनिधी:- दिलीप अनारसे


कर्जत तालुक्यातील अंबिजळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आमदार बच्चु कडु यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन बाबुराव निकत हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती नानासाहेब निकत, गावचे माजी सरपंच अभिमान निकत, जेष्ठ नागरिक बबन रासकर, बाबा शेख, गोपीनाथ अनारसे, माजी सरपंच महेश मोरे, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम निकत, किशोर निकत, धनंजय निकत, सामाजिक कार्यकर्ते अनिल निकत, माजी ग्रामपंचायत सदस्य किशोर निकत, फिरोज शेख,शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण जी, सर्व शिक्षक स्टाफ विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते, 

   बच्चुभाऊ यांनी महाराष्ट्रातील सर्व दिव्य अंगाचे असलेल्या व्यक्तीला मोठा न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्या कार्यासाठी तसेच भाच्चुभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. तर कार्यक्रमाचे आयोजन प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आभार सहशिक्षिका मनिषा पिसे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post