मंगरुळपीर तालुक्यातील सर्व शाळा विद्यालय मध्ये पाणी शुद्धीकरणासाठी फिल्टर मशीन आरो बसवा मनसे कार्यकर्ते यांची मागणी..



प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर



वाशिम ;  मंगरुळपिर, मनसे विद्यार्थी सेना मा. तालुकाध्यक्ष  जतिन सोनोने यांनी मंगरुळपीर तालुका मधील सर्व शाळा विद्यालय मध्ये पाणी शुद्धीकरणासाठी फिल्टर मशीन आरो बसविण्याबाबत. मंगरूळपीर गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले आहे. सदर निवेदनात अशी नमूद करण्यात आले आहे की  पिण्याच्या पाण्यासाठी व त्याच्या शुद्धीकरणासाठी प्रतेक्ष शाळे मधी वॉटर फिल्टर बसवून सर्वांना शुद्ध पाणी मिळावे याकरिता विद्यार्थी सेनेचे मोहन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात व सामाजिक कार्यकर्ते जतिन सोनोने यांच्या वतीने मंगरूळनाथ तालुक्यामध्ये मागील बन्याच वर्षापासून काही शाळेत पिण्याच्या पाण्यासाठी व त्याच्या शुद्धीकरणासाठी कोणतेही अद्यापही आरो मशीनलावण्यात आलेले नाही.

सदर बाब अशी कि, शाळेत मुलांना तसेच शाळेतील शिक्षक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांना दूषित पाणी तसेच क्षारयुक्त पाणी पियावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याविषयी समस्या निर्माण होउन शारीरिक रोगराई सहन करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची

शक्यता नाकारता येत नाही.



तरीही माझी आपणास सविनय विनंती आहे कि, मंगरुळपीर तालुका मधील सर्व शाळे मधी पिण्याच्या पाण्यासाठी पाणी  शुध्दीकरण यंत्र सुविधा तात्काळ करण्यात यावी व सदर बाबीचा तातडीने विचार विनिमय करून लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा.  असे निवेदन यावेळी मनसेच्या वतीने देण्यात आले. या वेळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post