कुत्रे मागे लागल्याने आणि माणसाला भुजाडून ग्रामस्थांच्या घरात व पत्रावर शिरूर जखमी झाल्याने एक गंभीर जखमी एकाचा मृत्यू
वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर
वाशिम ; आज दि.५ जुलै रोजी , वाशिम येथून जवळच असलेल्या ग्राम कोंडाळा झामरे येथील शेत शिवारातील रोहि (नीलगाय) हे पाण्याच्या शोधात ते भटकंती करीत तहानेच्या आकांताने गावाच्या जवळच्या शेत शिवारात शिरले त्यातील दोन रोही कुत्र्याने त्यांचा खेदा घेऊन ते गावामध्ये शिरले गावातील लोक व घरे विचित्र दिसत असल्यामुळे अचानकपणे ते गावातील गल्लीमध्ये घुसले कोंडाळा झामरे येथील ग्रामस्थांच्या घरावरती चढले आणि दोन्हीही रोही घरामध्ये कोसळले त्या मुळे पायाला व पोटाला पाठीला मार लागल्याने रक्त भांबळे झाले असून आणि पत्राने चिरल्याने रक्तस्त्राव झाला.. ही घटना आज दिनांक पाच जुलै रोजी सकाळी ७ : ३० ते ८ : ०० वाजताच्या सुमारास घडली.यावेळी
ग्रामस्थांनी मोठ्या सीताफिने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र बाहेर काढले असता त्यांना अनेक ठिकाणी अंगावर घरावरील पत्रे हे पडून पाठीला, पोटाला ,पायाला, लागून चिरले अनेक ठिकाणी त्यांना मार लागल्याचे आढळून आले आहे. हे सर्व प्राणी डोंगरभागात व शेतात राहत असून पाण्याच्या शोधात अचानक गावात शिरल्याने एक त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाल्यामुळे बुजाडून गेले. अशातच एका रोह्याचा मृत्यू झाला. गावकऱ्यांनी त्यांचा जीव वाचवा मानून अनेक प्रयत्न केले. परंतु घाबरून व मार लागल्यामुळे त्यातील एका रोह्याचा मृत्यू झाला. या वेळी गावातील नागरिक सरपंच मानवतकर ,जगदीश देशमुख, वसंता इंगोले, नितीन इंगोले, नारायण झामरे ,राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक रामेश्वर झामरे, व गावकरी मंडळी यांनी या नीलगाय ला वाचाविण्या साठी परिसर्म घेतले. यावेळी वन विभाग यांना संपर्क साधून घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली. घटनास्थळी वन विभाग कर्मचारी दाखल झाले. या घटेंचा पंचनामा करून पुढील तपास करीत आहे.
