प्रदिप पट्टेबहादुर - वाशिम प्रतिनिधी
वाशिम ; इथून जवळच असलेल्या ग्राम वाई येथे रखडलेल्या कामना संजीवनी
ग्राम वाई येथे अनोख्या पध्दतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या २६ जून जयंती निमित्ताने गावातील प्रलंबित व पावसाळ्यात नागरि रस्त्यांना जाताना येताना त्रास दायक ठरत असलेल्या गावातील रस्ता व नाली यांच्या कामना मूर्त रूप हे आरक्षणाचे जनक लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आली आहे. याकरिता ग्रामपंचायत वाई यांच्या पुढाकाराने मजुरी देण्यात आली असून सर्वांगी व समाजाचा विकास व्हावा आणि यातून गावाचे चित्र बदलावी याकरिता नेहमी समाजकार्यात आपली भूमिका दर्शविणाऱ्या तथा अंगणवाडी सेविका ते गावाच्या सरपंच अश्या प्रवास करणाऱ्या गावाच्या सरपंच सौ.कांताबाई कंकाळ व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी या पुढे एक जुटीने गावाचा विकास हाच खरा ध्यास असे सूत्र हाती घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारातील तुझं गावच नाही का तीर्थ रे बाबा कशाला रिकामा फिरत असे ग्रामगीतेतील सूत्र विकास कामातून हाती घेऊन गावातून रस्त्याच्या कामचे उदघाटन केले. या वेळी वाई ग्रामपंचायत सचिव सुनील खाडे , पंचायत समिती सदस्य बळीराम माहुरे, ग्रामपंचायत सदस्य संतोष मस्के, रामेश्वर पांढरे , दादारावजी पांढरे ,रामा उगले ,ग्रामपंचायत रोजगार सेवक विष्णु पांढरे, शिपाई भगवान मस्के, सामाजिक कार्यकर्ते यश भैया कंकाळ गावकरी मंडळी उपस्थित होते. अनोख्या पध्दतीने सर्वांगीण विकास व गावचा विकास साधला जावा याकरिता 26 जून राजश्री शाहू महाराज जयंतीच हाती घेतल्याबद्दल जिल्हाभरत कौतूक केले जात आहे.
