प्राथमिक आरोग्य केंद्र रांजणगाव गणपती तालुका शिरूर



     

    आरोग्य विभाग


 पावसाळ्यात नागरिकांनी घ्यावयाची काळजी


 _जाहिर सूचना 

सर्व  नागरिकांना सूचित करण्यात येते की,पावसाळ्यातील साथरोग बाबत प्रतिबंधात्मक खालील उपाययोजना कराव्यात.


१) तीव्र ताप आल्यास रूग्णांचे अंग ओल्या कापडाने पुसून काढावे. रूग्णाला ताबडतोब जवळच्या सरकारी किंवा खाजगी दवाखान्यात उपचार करून रक्ताची तपासणी करून घ्यावी. 


२) डेंग्यू, हिवताप व चिकनगुणीयाचे डास स्वच्छ पाण्यात तयार होत असल्यामुळे घरातील पाणी साठवण भांडी,टाकी,ड्रम, रांजन, माठ व इतर भांडी आठवड्यातून एक दिवस घासून पुसून स्वच्छ करावी व कोरडा दिवस पाळावा. 



३) परिसरातील स्वच्छ पाण्याची डबकी नष्ट करावी.

४) साठलेल्या पाण्यात डासांच्या अळी     मारण्यासाठी ऑईल टाकावे


५)  डासांचा त्रास कमी करण्याकरिता शौचालयाच्या गॅस पाईपला पातळ कापड किंवा जाळी बांधावी. 


६) परिसरातील टाकावू वस्तूत पाणी साठवून राहणार नाही याची खबरदारी घ्यावी. उदा.- टायर, नारळाच्या करवंट्या, डब्बे इ.



८) डेंगूचे  डास दिवसा चावतात त्यामुळे दिवसा झोपतांना सुद्धा मच्छरदानीचा वापर करावा.



११) घरातील खिडक्यांना जाळी लावावी.


१२) डांस प्रतिबंधक साधनांचा वापर करावा. उदा. Mortin लिक्विड, ओडोमास ट्यूब इत्यादी.


१३) घर व परिसर स्वच्छ ठेवावा.


१५) घसादुखी, तीव्रताप, अंगदुखी, सर्दी व खोकला इ. स्वाईन फ्लू सारखे लक्षणे दिसून आल्यास शासकीय दवाखान्यातच उपचार करून घ्यावा. स्वाईन फ्लू चे औषधे केवळ शासकीय दवाखान्यातच मोफत उपलब्ध आहे.


१६) घरातील ओला व सुका कचरा विलगीकरण करून घंटागाडीतच टाकावा.


१७) पाण्यात डबक्यात गप्पी माश्यांचा (डास अळ्या खाणाऱ्या) वापर करावा. 


१८) उघड्यावरचे व शिळे अन्न खाणे टाळावे.

 


२०) शेतात / नोकरी साठी जातांना घरून निर्जंतुकीकरण केलेले पाणी पिण्यासाठी सोबत न्यावे..



२३) पावसाळ्यात उकळून थंड केलेले किंवा निर्जंतुकीकरण केलेल्या पाण्याचाच पिण्यासाठी वापर करावा. 


 २५) नळ गळती आढळल्यास तशी ताबडतोब सूचना संबंधित ग्रामपंचायत ला द्यावी.


२६) उघड्यावर शौचास बसणे टाळावे.


२७) ओव्हरहेड टँक व घरगुती वापरावयाची पाण्याची टाकी, पाणी साठे झाकून ठेवावे.


                  वैद्यकीय अधिकारी

 *प्राथमिक आरोग्य केंद्र रांजणगाव गणपती ता.शिरूर

Post a Comment

Previous Post Next Post