प्रतिनिधी अन्सार शेख
रिसोड : करंट लागून ऐका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 6 जुलै रोजी दुपारी एकच्या दरम्यान रिसोड शहरातील सिविल लाईन भागात घडली. स्वाती रामप्रसाद वायभासे वय 35 वर्षे असे मृतक महिलेचे नाव असून पावसाचे पाणी पाईप मधून पडत नसल्याने ते पाईप बसवण्याकरिता छतावर गेली होती यादरम्यान छतावरील लोखंडी जाळीमध्ये करंट आल्याने तिला जबर धक्का बसला व तिचा जागीच मृत्यू झाला. स्वाती छतावर पाईप बसवण्यासाठी गेली होती त्यावेळेस लोखंडी जाळीला एक तार बांधलेला होता सदर तार चा एक दुसरा भाग समोरून गेलेल्या विद्युत तारामध्ये अडकलेला होता. याची कल्पना स्वातीला नव्हती. पाइप बसवण्यासाठी तिने हात बाहेर काढला जाळीला स्पर्श होताच तिला करंट चा जबरदस्त धक्का बसला. याबाबतची सूचना महावितरण कर्मचाऱ्यांनी देण्यात आली महावितरणचे कर्मचारी अतुल पाटील थेर व शेख राहील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्वप्रथम या भागातील विद्यूत पुरवठा बंद केला तर नंतर ॲम्बुलन्स बोलवून स्वातीला येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले. मात्र तेथे डॉक्टरांनी तिचा तिला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलीस कारवाई करत होती मृतक स्वाती रिसोड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाशराव वायभासे यांची सून होती. स्वातीच्या मृत्यूने त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
