माथाडी आणि जनरल विभागाच्या दौंड तालुका उपाध्यक्ष पदी अमोल कुलंगे...




दौंड:- आलिम सय्यद

दौंड तालुक्यातील पांढरेवाडी येथील अमोल प्रकाश कुलंगे यांची राष्ट्रीय मजदूर संघाच्या माथाडी आणि जनरल विभागाच्या दौंड तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.  यावेळी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष  सुनील शिंदे, 

उपाध्यक्ष सीताराम चव्हाण , यांच्या हस्ते कुलंगे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. संघटना वाढीसाठी व जास्तीत जास्त माथाडी व विविध कामगारांना न्याय मिळवून देणार व मला संघटनेनी दिलेली जबाबदारी पार पाडणार  असल्याचं यावेळी अमोल कुलंगे यांनी सांगितले.  या निवडी वेळी पुणे जिल्हाध्यक्ष माथाडी राष्ट्रीय मजदूर संघ आण्णा देवकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सागर शेवाळे  यावेळी उपस्तिथ होते.

Post a Comment

Previous Post Next Post