एक लाख अकरा हजार एकशे अकरा रोपांचे होणार संपूर्ण सोलापूर जिल्हा मधी वृक्षारोपण
"दादाश्री ऑक्सिजन पार्क" मोहिमेमधून जिल्ह्यातील एकूण प्रत्येक शाळांमध्ये एकुण मिळुन एक लाख 11 हजार 111 झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे त्याचा शुभारंभ आय.ए.एस.बालाजी मंजुळे सर यांच्या हस्ते जि प प्रा शाळा पोंधवडी येथून सुरू करण्यात आला.वृक्षारोपन प्रंसगी बोलताना पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास यासाठी वृक्षारोपण गरजेचे असून माणसांनी झाडे लावणे गरजेचे आहे.काका काकडे यांच्या दादाश्री फाउंडेशन चे वृक्षारोपण काम हे कौतुकास्पद आहे असे मत वृक्षारोपण लागवड प्रसंगी आहेस बालाजी मंजुळे सर यांनी बोलून दाखवले..दादाश्री फाउंडेशन ही संस्था वृक्षारोपण चळवळीतील अग्रगण्य संस्था आहे .या कार्यक्रमासाठी आय.ए.एस.श्री.बालाजी मंजुळे सर ,राजकुमार पाटील गटशिक्षणाधिकारी करमाळा ,जिल्हा परिषद सदस्य बिभीषण आवटे ,कृषी उत्पादन बाजार समिती संचालक आनंद कुमार ढेरे, वीटचे सरपंच उदय ढेरे , पोंधवडीचे सरपंच मनोहर कोडलिंगे , अंजनडोह चे सरपंच अमोल शेळके ,विहाळ चे सरपंच मोहन मारकड, युवा उद्योजक दिगंबर चोपडे ,जीवन आवटे ,संतोष आबा ढेरे दादाश्री फाउंडेशनचे अध्यक्ष माधव जाधव अमोल कोडलिंगे ,महादेव भिसे अमोल गाडे,राम मंजुळे पो.कॉ.पोळ साहेब यांच्यासह प्रतिष्ठित मान्यवर व ग्रामस्थ महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या म्हेत्रे गुरुजी यांच्या सूत्रसंचालनाने सर्वांची मने जिंकली. गायकवाड गुरुजी व मुख्याध्यापक साबळे सर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनिल जाधव, उपाध्यक्ष गंगाराम अनारसे व सर्व कर्मचारी वृंद यांनी योग्य नियोजन केले..वृक्षारोपण कार्यक्रमाच्या नंतर श्री भिसे यांच्या शिवशंकर सार्वजनिक वाचनालयाला आय.ए.एस.बालाजी मंजुळे सर यांनी सदिच्छा भेट दिली,त्याचबरोबर ग्रामपंचायत विहाळ येथेही आय.ए.एस.बालाजी मंजुळे सर यांनी सदिच्छा भेट दिली..वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आवर्जून आंध्रप्रदेशावरून येऊन उपस्थित राहिल्याबद्दल श्री काका काकडे यांनी आय.ए.एस.बालाजी मंजुळे सर यांचे विशेष आभार मानले
