प्रतिनिधी- शंकर तिडके
भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेची धडक कारवाई अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव या ठिकाणी दलित समाजातील मुलांवरती कबूतर चोरीचा आरोप घेऊन त्या ठिकाणी मुलांना हातपाय बांधून व झाडाला टांगून मारण्यात आल्याचा प्रकार घडला त्या ठिकाणी भीम आर्मी भारत एकता मिशन चे प्रदेशाध्यक्ष सिताराम भाऊ गंगावणे तसेच पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप भाऊ शेलार नगर जिल्हा अध्यक्ष तानसेन बिवाल जिल्हा नेते पापाभाई जिल्हा कार्याध्यक्ष अरुण भाऊ पवार राहुरी शहर अध्यक्ष बबन जगधने तालुका अध्यक्ष गुलशन भाई बिवाल शिरूर तालुका अध्यक्ष अजित दादा नरवडे किशोर शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष मुन्ना ताई चावरे राहुरी तालुका अध्यक्ष दिपालीताई शुभम बिवाल आणि असंख्य असे भीमसैनिक हजर होते त्यामधील मारहाण झालेल्या पैकी एका मुलास आई-वडील नसल्याकारणाने त्याचा पूर्ण शिक्षणाचा खर्च भीम आर्मी भारत एकता मिशनचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष सिताराम भाऊ गंगावणे यांनी उचलला आहे त्यावेळेस सिताराम भाऊ गंगावणे यांनी समाजाला एकत्रित करून जो दलित समाजावर अन्याय होत आहे हा अन्याय आपण का सहन करायचा आपल्यावरतीच का चोरीचे आरोप घेऊन अन्यायाला भाग पाडायचं तसेच इथून पुढे महाराष्ट्र राज्यामध्ये बहुजन समाजावरती दलित समाजावर इतर समाजाकडून अन्याय करण्यात आला तर खपवून घेणार नाही असे खडखडीत आणि खणखणीत सांगण्यात आले
