गांगलवाडी ग्रांम पंचायत वतीने वाॅटर फिल्टर चे उद्घाटन



शिवकुमार घुगे मालेगाव 

गांगलवाडी येथे ग्रामपंचायत मार्फत सार्वजनिक वॉटर फिल्टर चे उद्घाटन करण्यात आले. आज दिनांक 29/ 8 /2023 ला सकाळी नऊ वाजता ग्रामपंचायत सरपंच कौशल्याबाई भुरकाडे उपसरपंच अनिताताई इंगळे माजी पंचायत समिती सदस्य दिलीपराव भुरकाडे ग्रामपंचायत सदस्य जगदीश इंगळे रंजनाताई भुरकाडे ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश भुरकाडे यांच्या उपस्थितीत गावचे जेष्ठ नागरिक चंद्रभान वाघमारे व गावचे व्यापारी बबन इंगळे यांच्या हस्ते फिल्टर प्लांट चे उद्घाटन करण्यात आले गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या हेतूने प्रत्येक कुटुंबाला सहा रुपये प्रमाणे कॅन एटीएम द्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली. या उपक्रमाचे गावकऱ्यांनी कौतुक केले या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला रवि शेळके ग्रांम पंचायत सदष्य नाजुक नाईक ग्रांम पंचायत सदष्य राजेश भुरकाडे उमेश राठोड पाणी पुरवठा कर्मचारी गावातील तरुण मंडळी गावकरी मंडळी व महिला मंडळी उपस्थित होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय भुरकाडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन राजू लाव्हरे यांनी केले

Post a Comment

Previous Post Next Post