य.च.सैनिक शाळेचा यश सोनवणे यांची विभाग स्तरावर निवड




मालेगाव ; उमेश लहाने


        क्रीडा व युवक सेवा संचालनालय  तथा जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिम   यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय जिम्नास्टिक  क्रीडा स्पर्धेमध्ये यशवंतराव चव्हाण सैनिक शाळा सुपखेला वाशिम येथील यश सोनवणे U19 मध्ये याची विभाग स्तरावर निवड झाली आहे. विजयी खेळाडू आपल्या यशाचे श्रेय क्रीडा शिक्षक एक.के.चांदणे यांना देतात. विजयी खेळाडूचा संस्थेचे अध्यक्ष सुभाषरावजी ठाकरे माजी राज्यमंत्री तथा चंद्रकांत ठाकरे संस्थेचे सचिव व अध्यक्ष जिल्हा परिषद वाशिम,डि.एन.पाटील,शाळेचे प्राचार्य एम.एस.भोयर,कर्नल पी.पी.ठाकरे कमांडंट,उपप्राचार्य एस.बी.चव्हाण यांनी यश सोनवणे यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.असे प्रसिद्ध विभाग प्रमुख रमेश आर. पडवाळ यांनी कळविले.

Post a Comment

Previous Post Next Post