मालेगाव : उमेश लहाने
श्री तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय वाशिम येथे भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ एस.आर.रंगनाथन यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली, त्यानिमित्ताने ग्रंथालय विभागाचे वतीने विविध शास्त्रज्ञ, क्रांतिकारक, समाजसुधारक व ऐतिहासिक थोर व्यक्ती, नामवंत राजकारणी इत्यादिंचे चरित्र व काही आत्मचरित्रांची भव्य ग्रंथ प्रदर्शनी आयोजीत करण्यात आली.
रंगनाथन पुण्यतिथी कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन केले असता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी ग्रंथालयास भेट दिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष जाधव उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी डॉ. पद्मानंद तायडे, डॉ. संतोष धामणे, डॉ.संतोष इंगोले, डॉ.दत्तात्रय ढवारे, प्रा.रिंकू रूक्के प्रा. सुनिता अवचार, प्रा. मोरे, प्रा. गोदारा, प्रा. खान, प्रा. कवर, प्रा.देशमुख, प्रा. वाघ, प्रा.कु. सुरुशे, प्रा.कु.मोरे तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दत्तात्रय ढवारे यांनी केले, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. विजय जाधव यांनी केले.
तसेच आभार प्रदर्शन प्रा डॉ संतोष इंगोले यांनी केले.
यासाठी कु कोमल बाजड, कु कोमल कठाळे, कु राणी वानखडे, कु सीमा खंडारे यांनी विशेष परिश्रम घेतले.
