प्रतिनिधी_अर्जुन शेळके
आदर्श शाळा पिंपरी दुमाला येथील शालेय शिक्षण समितीचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे मावळत्याअध्यक्षा कल्पनाताई खळदकर व उपाध्यक्ष बापू शेळके यांच्या रिक्त झालेल्या जागेवरती आज पिंपरी दुमाला शालेय शिक्षण समिती यांच्यावतीने अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आले या निवडीमध्ये मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते यामध्ये सर्वानुमते अध्यक्ष पदी शशिकांत चिखले व उपाध्यक्ष पदी वर्षाताई खळदकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडी वेळेस सन 2023 ते 2025 या कार्यकाळात सदस्य म्हणून श्री माणिक कोंडीबा म्हाळसकर (मा उपसरपंच ग्रामपंचायत पिंपरी
दुमाला) (शिक्षण तज्ञ) म्हणून श्री राहुल रामदास खेडकर,सौ पूजा शरद चिखले,सौ आरती विकास सोनवणे ,श्रीमती सुनिता महेश डोळस ,सर्व प्रतीक्षा महेंद्र डोळस ,श्री माणिक सर्जेराव चिखले ,श्री विशाल हरिभाऊ खळदकर ,सौ वैशाली तुषार चिखले शितल आबा चिखले यांची निवड करण्यात आली
या निवडीमध्ये प्रामुख्याने सभेच्या अध्यक्षस्थानी पिंपरी दुमाला सरपंच महेंद्र डोळस होते तर उपस्थित उपसरपंच शरद खळदकर,मा.तंटामुक्ती अध्यक्ष संदीप आप्पा सोनवणे, सो देवस्थान अध्यक्ष सुनील बापू सोनवणे मा.उपसरपंच कचरदास डोळस,देवस्थान सचिव श्रीकांत सोनवणे इत्यादी मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते.
ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी राहुल चातुर सर तसेच कांताराम शिंदे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
