भारत मुक्ती मोर्चा यांचे वतीने २ ऑक्टोंबर ला बंदचे आवाहन




केनवड:- भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चा, बुध्दिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, सत्यशोधक मूलनिवासी वारकरी महासंघ, मौर्य क्रांती संघ, लहुजी क्रांती मोर्चा द्वारे २ ऑक्टोबर २०२३ रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन 


केनवड:-सद्या महाराष्ट्रामध्ये अस्तित्त्वात असलेल्या हुकूमशाही सरकारचा निषेध म्हणून 2  ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले असून  केनवड मध्ये सुध्दा बंदचे आवाहन करण्यात आले आहे.सदर बंद चे अनुषंगाने पुढीप्रमाणे मागणी करण्यात आली आहे त्यामधे

    गृहमंत्री फडणवीसाच्या आदेशावरून मराठा आंदोलकांवर केलेल्या अमानुष लाठी हल्ला व गोळीबाराच्या विरोधात,महाराष्ट्र राज्याच्या ६२ हजार सरकारी शाळांचे खाजगीकरणाच्या संविधानविरोधी व बहुजनविरोधी आर.एस.एस/भाजप सरकारच्या धोरणाच्या विरोधात , शिव - फुले-शाहु, आंबेडकरांचा महाराष्ट्र बैठ बिगारांचा महाराष्ट्र करणा-या

आर.एस.एस/भाजप सरकारच्या धोरणाविरोधात, ओबीसींची जातनिहाय जणगणना करणे व संविधानिक हक्क आधिकारांच्या समर्थनात,बहुजनांचे प्रेरणास्थळ पंढरपुरचे पांडुरंगाचे मंदीर बडवे ब्राम्हणाच्या स्वाधीन करण्याच्या - आर.एस.एस/भाजपच्या षड्यंत्राच्या विरोधात. बहुजन महापुरूषांचा, संविधान व राष्ट्रप्रतिकांचा अपमान करणा-या देशद्रोही आतंकवादी दंगलखोर मनोहर भिडेला अभय देणा-या भाजप सरकारच्या विरोधात.निषेध करण्यासाठी सदर बंद मधे सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष धम्मदास वाकुडे यांनी केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post