केनवड येथे तणावपूर्ण शांततेत गणरायाला निरोप




केनवड २९ सप्टेंबर :- मागच्या दहा दिवसांपासून राज्यभरातील अनेक गणेश मंडळे मोठ्या थाटामाटात गणपती उत्सव साजरा करत आहेत. काल लाडक्या गणरायाला मोठ्या उत्साहात निरोप दिला.दरम्यान मागच्या दोन वर्षांत कोरोनामुळे अनेक जिल्ह्यात गणपती उत्सव साधेपणात झाले होते.यामुळे यंदा डीजे आणि पारंपारिक पद्धतीने गणरायाला निरोप देण्यात आला. राज्यातील इतर ठिकाणी किरकोळ वादावादीचे प्रसंग घडले यामध्ये केनवड येथे  दोन गटात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे शिरपूर पो स्टेशनचे ठाणेदार चव्हाण व त्याच्या सहकार्याने वेळीच हस्तक्षेप करून वाद मिटवल्याने वातावरण शांत झाले व रात्री दहा वाजता चे नंतर शांततेत गणरायाचे विसर्जन करण्यात आले.


वाशिम सह इतर भागाप्रमाणेच केनवडमध्ये जोरदार गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळाला.मात्र,यावेळी केनवड येथे पोलीस प्रशासनाचे नियोजन नसल्यामुळे दोन गटात मिरवणुक एकाच मार्गाने काढण्यासाठी  मंडळामध्ये वाद वाढण्याची शक्यता वाटत असल्यामुळे  ऐन वेळेवर बीट जमादार सरनाईक व पोलीस पाटील यांच्या लक्षात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सदर गणपती मंडळ यांचे पदाधिकारी सोबत चर्चा करून वेगवेगळा मार्ग ठरवून दिलेला होता परंतु काही मंडळाचे पदाधिकारी यांनी एकाच मार्गाने पाठोपाठ मिरवणुकीची भूमिका घेतल्याने काही काळ मिरवणुक थांबविण्यात आली त्यामूळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने सदर प्रकरण आप आपल्या कार्यकर्त्याने आजी, माजी लोकप्रतिनिधि यांचे पर्यंत  नेले त्यामुळे अधिकच गणपती मिरवणुकीला राजकीय रंग देण्यात आल्याचे यावेळी दिसून आले.यामुळे पोलीस प्रशासनाची मात्र तारांबळ उडाली त्यामुळे घटनेचे गांभीर्य ओळखून शिरपूर पो.स्टेशनचे ठाणेदार हे आपल्या ताफ्यासह केनवड येथे येऊन दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना समजाऊन सांगीतले व रात्री दहा वाजता चे नंतर केनवड येथील गणरायाचे  शांततेत विसर्जन पार पडले यावेळी शिरपूर पोलीस स्टेशनचे पो.निरीक्षक चव्हाण,उप निरीक्षक टाले,बिट जमादार सरनाईक,केनवडचे पो.पाटील माणिक खराटे,पोलिस कर्मचारी यांचा तगडा बंदोबस्त तैनात होता

Post a Comment

Previous Post Next Post