सोमेश्वर महाराजांच्या यात्रेत रंगला कुस्त्यांचा फड 100 पेक्षा अधिक मल्लांनी नोंदवला सहभाग
प्रतिनिधी- शिरूर अर्जुन शेळके
महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांचे आराध्य दैवत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथील श्री सोमेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत श्रीगोंदा केसरी व शिरूर उपकेसरी अण्णापूर यांच्यात अंतिम सामना रंगला यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत 100 पेक्षा अधिक मल्लांनी सहभाग नोंदवला होता शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री सोमेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त भव्य अशा कुस्ती स्पर्धेचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेसाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या मल्लांनी हजेरी लावली
गेल्या अनेक दशकांची कुस्ती स्पर्धा पिंपरी दुमाला येथे आयोजित होत असते ही कुस्ती स्पर्धा यात्रेचे आकर्षण ठरली कुस्ती स्पर्धेत पंच म्हणून मा उपसरपंच मोहन चिखले देवस्थान सचिव डॉक्टर श्रीकांत सोनवणे मा उपसरपंच काळूराम चिखले मा उपसरपंच कैलास पिंगळे मा ग्रा सदस्य शहाजी जगदाळे उद्योजक मंगेश बडदे यांनी काम पाहिले शेवट चाललेल्या कुस्तीमध्ये दोन्ही मल्लांनी आटातटीची लढत दिली व कुस्ती बरोबर सोडवण्यात आली शेवटच्या कुस्तीसाठी ग्रामस्थांकडून 11000 रुपये रोख इनाम ठेवण्यात आला होता शेवटचा स्पर्धेसाठी मा सरपंच शिवाजीराव चिखले मा उपसरपंच शरद खळदकर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष सुनील सोनवणे चेअरमन शहाजी खळदकर देवस्थान खजिनदार शेखर पाटेकर मा उप सरपंच माणिक म्हाळसकर मा चेअरमन रवींद्र बडदे पोलीस पाटील संतोष जाधव तंटामुक्ती अध्यक्ष अमोल चिखले देवस्थान कार्याध्यक्ष अभिषेक शेळके उद्योजक दत्तात्रय सोनवणे राजेंद्र चिखले बापू शेळके अर्जुन चिखले जयराम चिखले चंद्रकांत चिखले विशाल खळदकर सतीश दुर्गे सुरेश डोळस आदी उपस्थित होते
