श्री संकट हरण महादेवाचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन
पुणे दि.२८(संदिप डोके) कोंढवा खुर्द एनआयबीएम येथील श्री संकट हरण महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त हजारो शिवभक्तांनी दर्शन घेतले
मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट केली होती पहाटे पासुनच भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या रुद्रअभिषेक,रुद्रस्वहकार,पुर्णाहुती,अभिषेक,होम-हवन,फराळ वाटप ,भजन ,धुपआरती,शिवभंडारा असे विविध कार्यकमांचे आयोजन केले होेते मंदिर परीसरात विविध दुकाने थाटली होती कोंढवा खुर्द ग्रामस्थ व सर्व सेवाभावी मंडळे यांनी
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले माजी नगरसेवक तानाजी ज्ञानदेव लोणकर यांनी संयोजन केले होते विविध राजकिय, सामाजिक तसेच कोंढवा भागातील भाविकांनी दर्शन घेतले
Tags
धार्मिक
