शालेय मुलांना मोबाईलच्या वापरापासुन दुर ठेवा:हभप निवृत्ती महाराज देशमुख



मंचर दि१(संदिप डोके) सध्या समाजामध्ये मोबाईलचे प्रमाण खुप वाढले पालकांनी मुलांना मोबाईलच्या वापरा  पासुन दुर ठेवावे  

शालेय मुलांमध्ये मोबाईलचे प्रमाण वापराताना मोठ्या प्रमाणात दिसत असुन भविष्यात ही चिंतेची बाब असल्याचे मत राष्ट्रीय किर्तनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख यांनी व्यक्त केले

    श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथे गणेश जयंती उत्सवामध्ये देवजन्माच्या किर्तना प्रसंगी ते बोलत होते यावेळी त्यांनी अनेक कौटंबिक उदाहरणे देऊन तरुण पिढी वाया जाऊन देता कामा नये तरुण पिढी हिच देशाची भविष्यात खरी ताकत असल्याचे हभप निवृत्ती महाराज देशमुख यांनी सांगीतले.गणेश जयंत्तीनिमित्त पहाटे श्रीस अभिषेक पुजा,हारतुरे व मांडव डहाळे मिरवणुक ,लेझिम पथक,महाआरती भजन,तसेच श्रीच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात आली तसेच सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला स्वयंभु मोरया गणपती मंदिर फुलांनी तसेच विद्युत रोशनाईने सजविण्यात आले होते गणेश जयंती निमित्त पहाटे पासुनच भाविकांनी श्रीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती

Post a Comment

Previous Post Next Post