परीट सेवा मंडळ पालघर जिल्हा संस्थेच्या वतीने करण्यात आलेला श्री राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांची १४९ वी जयंती सोहळा व महिला हळदीकुंकू, वधू-वर मेळावा उत्साहत संपन्न
*परीट सेवा मंडळ पालघर या संस्थेच्या वतीने रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय संत गाडगे बाबा जयंती सोहळा हळदीकुंकू समारंभ वधुवर मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन गोल्डन नेस सभागृह वसई पश्चिम येथे करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष र-थान संस्थेचे नियोजित अध्यक्ष श्री. निलेश बबन पालशेतकर यांनी भुषविले मान्यवरांच्या शुभहस्ते राष्ट्रीय संत गाडगे बाबा व स्व.रमाकांत शेठ कदम साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार व दिपप्रज्वलन करून करण्यात आले बाबांचे भजन "गोपाला गोपाला देवकीनंदन नंदन गोपाला" घेण्यात आले संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे सभासद समाज बांधव देणगीदार यांना यथोचित सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. संतोष बंधू सवतिरकर महासचिव महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ मुख्य महासचिव आरक्षण समन्वय समिती सचिव मुंबई ठाणे परीट धोबी सेवा मंडळ यांनी सादर करताना संस्थेच्या आजपर्यंतच्या कार्याचा आढावा सादर केला अल्पवयीन संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे देणगीदार हितचिंतक यांची नावे वाचन केली संस्थेचे पुढील उद्दीष्ट याबाबत सविस्तर माहिती दिली समाजबांधव सभासद यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले*
*संस्थेच्या माध्यमातून* *व मुंबई ठाणे कोकण वधुवर व्हाॅटसाॅप ग्रुप याच्या माध्यमातून दुसऱ्या वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे* *वधू वर यांचा प्रतिसाद व कार्यक्रमाची उपस्थिती पाहून आनंद व्यक्त केला आम्ही करीत असलेल्या कार्याची आपण दखल घेऊन बहुसंख्येने उपस्थित राहील्या बाबत उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली मान्यवरांच्या मार्गदर्शनात श्री. विजय कुमार पवार साहेब सामाजिक कार्यकर्ते माजी अध्यक्ष मुंबई ठाणे, श्री. मुरलीधर जनार्दन शिंदे साहेब अध्यक्ष निवड समिती महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ अध्यक्ष मुंबई ठाणे,श्री.अनंत वासकर साहेब सामाजिक कार्यकर्ते माजी अध्यक्ष जरीमरी मंदिर ट्रस्ट, सौ. र-नेहाताई विजय नाचणकर महिला कार्याध्यक्ष मुंबई ठाणे महीला प्रमुख मराठा परीट ज्ञाती तरुण संघ माटुंगा, श्री. संजय श्रीराम अंबावले अध्यक्ष महाड. पोलादपूर तालुका परीट सेवा मंडळ सदस्य मुंबई-कोकण वधूवर ग्रुप, श्री हरीश विजय चुनारकर सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले बाबांचे जिवनचरीत्र तसेच कदम साहेब यांच्या कार्याची माहिती दिली आरक्षण बाबत माहिती दिली वधू वर यांना उत्तम मार्गदर्शन केले उपस्थिती बाबत समाधान व्यक्त केले सौ. र-नेहाताई नाचणकर यांनी बाबांच्या जीवनावरील कविता सादर केली या कार्यक्रमाला४५ ते ५० वधुवर उपस्थित होते श्री.संतोष बंधू सवतिरकर यांनी वधुवर यांची नावे वाचन केली व परीचय.करून देण्यात आला उपस्थित वधूवर यांचे संस्थेच्या वतीने र-वागत करण्यात आले
संस्थेच्या कार्यक्रमासाठी हाॅलची व्यवस्था श्री.संजय तिडके साहेब संघटक पालघर जिल्हा यांच्या वतीने करण्यात आली होती हळदीकुंकू साहित्य संस्थेचे सल्लागार श्री.राजेन्द्र घाग साहेब व.श्री. दत्तात्रय आवले यांच्या वतीने साखर पोहे व रवा देण्यात आला तसेच महाप्रसाद व नाश्ता याचीही व्यवस्था सल्लागार श्री. राजेन्द्र घाग साहेब यांच्या वतीने करण्यात आली होती संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात कार्यात घाग साहेब यांचे मोठे योगदान आहे तिळगुळ साखरफुटाणे श्री. राजेन्द्र ऊजगावकर युवा अध्यक्ष सौ.ऋतुजा राजेंद्र ऊजगावकर महिला सचिव यांच्या वतीने करण्यात आले होते फुले व पशिवी श्री.सागर घाग खजिनदार सौ.रेश्मा घाग महीला सदस्य यांच्या वतीने करण्यात आली होते पाणी बाॅटल श्री.रमेश हुबरकर सौ.रचना हुंबरकर उपाध्यक्ष यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी देणगी रुपाने सहकार्य केले श्री. आशिष भाऊ रमाकांतशेठ कदम श्री.सुमंत महाडिक, श्री.लहु धोंडू शिंदे,श्री. महेश शिवडावकर,श्री. संजय सुरेशं शिंदे, राॅयल वेल्फेअर सोसायटी नालासोपारा श्री.राजु नांदगावकर,सौ. माधवी मनोहर शिंदे, श्री. विशाल लाड यांनी सहकार्य केले संस्था आपले मनःपूर्वक आभारी आहे
कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी सदस्य महिला पुरुष यांनी अथक परीश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सतिश टापरे सचिव प्रास्थाविक वधूवर नावे आभार प्रदर्शन श्री.संतोष बंधू सवतिरकर महासचिव यांनी उत्तम प्रकारे सादरीकरण केले या कार्यक्रमासाठी श्री. मुरलीधर जनार्दन शिंदे साहेब, श्री. विजय कुमार पवार साहेब, श्री.हरीश चुनारकर, श्री. अंनंत वासकर साहेब,श्री. संजय श्रीराम अंबावले अध्यक्ष महाड पोलादपूर तालुका, श्री.संजय यशवंत अंबावले सामाजिक कार्यकर्ते सौ. र-नेहाताई नाचणकर,सौ. ममता मधुकर हेदुळकर,सौ. नम्रता पावसकर, श्रीमती संगीता बामनोलकर उपाध्यक्षा मुंबई ठाणे सदस्य मुंबई ठाणे. वधुवर ग्रुप,श्रीमती उज्वला माजगावकर सहसचिव मुंबई ठाणे,श्री प्रकाश वरसकर साहेब प्रमुख मार्गदर्शक,श्री. उमेश वरणकर सहसचिव,सौ. कार्तिकी देवदत्त पाटणकर महीला सहसचिव मान्यवर म्हणून मंचकावर उपस्थित होते मुंबई ठाणे कोकण वधुवर गुप सदस्य म्हणून.श्री निलेश पालशेतकर श्री संतोष बंधू आणि श्री संजय यशवंत अंबावले श्री. संजय श्रीराम अंबावले श्री. चंद्रकांत महाडिक श्रीमती संगीता बामनोलकर सौ. निर्मला सुर्वे कामकाज पाहत आहेत यामधे संस्थेचे अध्यक्ष श्री. निलेश पालशेतकर यांचा.सिंहांचा वाटा आहे या माध्यमातून अनेक विवाह जमविले आहेत पुढील वाटचाल उत्तम प्रकारे चालू आहे बहुसंख्य समाज बांधव महिला पुरुष वधूवर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्तम प्रकारे संपन्न करण्यात आला राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
