नाशिक येथे मराठा विद्या प्रसारण समाज कार्यालयासमोर Ded कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण

 


नाशिक प्रतिनिधी गजेंद्र अहिरे

मराठा विद्या प्रसारक समाज संस्था नाशिक येथील DED कर्मचारी गेली 18 वर्षापासून कर्मचारी म्हणून नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक नाशिक येथे कार्यरत आहेत. परंतु त्यांचा कायमसवेसाठी अद्याप विचार केला गेला नाही म्हणून उपोषण मार्गाचा विचार त्यांनी घेतला आहे.

कार्यकर्त्यांची म्हणणे ऐकले असता. उपोषण करता म्हणून न्याय मिळवण्यासाठी लोकशाही मार्गाने मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कार्यालयाबाहेर आम्ही सर्व लोक आमरण उपोषण करत आहोत. आम्ही संस्थेला वारंवार तक्रार अर्ज करूनही आमच्या अर्जाचा अद्यापही काही विचार करण्यात आलेला नाही. म्हणून आम्हाला उपोषणासारख्या आसराचा वापर करावा लागत आहे. 

आमच्या सोबत घडलेल्या अन्यायकारक घटना थोडक्यात आम्ही सर्वजण DED फिक्स पे वर गेल्या १०ते १८ वर्षापासून कर्मचारी म्हणून काम करत आहोत. तरी सरकारच्या बदलत्या धोरणामुळे संस्था देखील आमच्या मागण्यामागे मान्य करण्यास तयार नसून. आम्ही मराठा विद्या प्रसारक कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करत आहोत.

तसेच आम्हाला शारीरिक मेडिकल त्रास झाल्यास त्यास पूर्णपणे मराठा विद्या प्रसारक संस्था व संबंधित प्रशासन जबाबदार राहील. असे आवाहन सर्व कर्मचाऱ्यांनी केलेले आहे. 

तरी मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेने लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेण्यात यावा.

Post a Comment

Previous Post Next Post