रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई 24 तासाच्या आत आरोपी ताब्यात घेऊन कारवाई केली

 नातेवाईकाच्या लग्नच येण्यास नकार दिल्यामुळे उसतोड मजुर पत्नीचा खून करून फरार झालेल्या आरोपीस अटक करण्यास



रांजणगाव प्रतिनिधी शंकर तिडके

रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हठीतील मौजे गणेगाव खालसा तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे दि. 11/02/2025 रोजी रात्री ऊस तोडणी करिता आलेला कामगार वामे माऊली उर्फ ज्ञानेश्वर आत्माराम गांगुर्डे राहणार दडपिंपरी तालुका चाळीसगाव जिल्हा जळमाव यांनी त्याची पत्नी मिनाबाई ज्ञानेश्वर गांगुर्डे वय 27 वर्ष हिचा नाशिक येथे त्यांचे नातेवाईकांचे लग्नास जाण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून तिला स्स्सीने लोखंडी बाजेला बांधून गळा आवळून तिला जीवे ठार मारून खून केला होता. त्यावरून मयताचा भाऊ तासचंद सुखलाल मौरे रा. मणेगाव खालसा ता शिरुर मुळ रा. सिध्दवाडी ता चाळीसगाव जि जळगाव याने संजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हयाची फिर्याद होती. खून केल्यानंतर आरोपी हा घटनास्थळावरून फरार झाला होता. आरोपीता शोध घेण्याचे मोठे आव्हान रांजणगाव एमआयडीसी पोलीस समोर होते सदस्वा प्रकार हा गंभीर असल्याने मा पोलीस अधिक्षक पंकज देशमुख सो यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीस पकडण्या करीता सुचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी तात्काळ तीन वेगवेगळी पथके तयार करून त्यांना आरोपीचा शोध घेणे बाबत सूचना दिल्या होत्या.


वरील पथकांनी सदर आरोपीचा मलठण, पिंपरी दुमाला तसेच परीसरातील साखर कारखाने, तसेच कारखान्याच्या आजूबाजूला असलेल्या ऊस तोडणीसाठी आलेल्या कामगारांकडे शोध घेतला. तसेच संगमनेर, कोपरगाव, श्रीगोंदा जिल्हा नगर येथे जाउन पोलीस पथकाने तेथील ऊस तोडणी कामगारांचे कडे, हॉटेल व्यवसायिकांकडे व काही शेतकऱ्यांकडे आरोपीचा शोध घेतला परंतु आरोपी मिळून येत नव्हता. त्यानंतर पोलीस पथकांनी सदर आरोपीचा शोध हा पाचोरा जि जळगाव, तसेच आरोपीचे मुळ गावी दडपिंपरी ता. चाळीसगाव जि. जळगाव येथे जाऊन शोध घेतला परंतु कोणते धागेद्वारे पोलीसांत्त्या हाती लागत नव्हते, तसेच दौंड व यवत भागातील उसाचे गु-हाळा वर जाउन तेथिल उसतोड कामगांरा कडे आरोपीचा शोध घेतला परंतु आरोपी मिळून आला नव्हता.


सदर आरोपीचा शोध सुरु होता दि 12/03/2025 रोजी पोलिसांना सदर आरोपी हा त्याचे मूळ गावी दहपिपंरी ता चाळीसगाव जि जळगाव येथे येणार असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने लागलीच पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सहा फौजदार दत्तात्रय शिंदे, पो हवा संतोष औटी, पो काँ प्रविण पिठले, पो काँ योगेश गुंड यांचे एक पथक त्याचे मूळ गावी पाठवले, पोलीस सदर आरोपीत्त्या गावात वेशांतर करून सापळा लावुन बसलेले असताना आरोपी लपतछपत त्यात्त्या गावात येत असताना पोलिसांनी त्याला शिताफिने तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली सदस्वा आरोपी हा गुन्हा केल्या पासून फरार होता तो मोचाईल वापस्त नसल्याने त्याला अटक करण्याचे पोलीसांना आव्हान होते. परंतु पोलीसांना आरोपीला पकडण्यात यश आले. सदर आरोपीस गुन्हह्याचे तपासकामी अटक करुन में कोर्टात हजर केले असता में. कोर्टाने सदर आरोपीस 6 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोसई शिवाजी मुळे हे करत आहे.


सदस्ती कामगिरी ही मा पोलीस अधिक्षक श्री पंकज देशमुख सो, मा श्री रमेश चोपडे अप्पर पोलीस अधिक्षक सो पुणे विभाग, मा श्री प्रशांत ढोले उपविभागिय पोलीस अधिकारी शिरूर विभाग शिरूर, यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरिक्षक महादेव वाघमोडे, पोसई शिवाजी मुंडे, पोसई अविनाश थोरात, सहाफौज दतात्रय शिंदे, पोहचा विजय सरजिठो, पोहवा संतोष औटी, पो हवा संदिप जगदाळे, पो हवा विलास आंबेकर, पो.कॉ योगेश गुंड, पो. कॉ उमेश कुतवळ, पो. कॉ प्रविण पिठले, पो. काँ किशोर शिवणकर, यांचे पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post