Celebrating International Women's Day at Washim ST Agar

 वाशिम एसटी आगारात जागतिक महिला दिन साजरा



वाशिम एसटी आगारात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार किशोर गोमाशे उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक अनिरुद्ध मेहेत्रे होते.


महिला कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. किशोर गोमाशे यांनी महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव केला, तर अनिरुद्ध मेहेत्रे यांनी "महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत," असे सांगून त्यांना प्रोत्साहन दिले.


कार्यक्रमाला उज्वला झापर्डे, संध्या मोरे, दीपाली पेंढारकर, साधना खोमणे, चंद्रकला जारे, अश्विनी जाधव, शुभांगी भोंबले, शालू शिंदे, वाहतूक निरीक्षक नंदकिशोर तेलगोटे, सहाय्यक वाहन निरीक्षक पुरुषोत्तम गावंडे, वाहतूक नियंत्रक मनिष बत्तुलवार तसेच एसटी कर्मचारी राजेश चपटे, महादेव घुगे, दामोदर गावंडे, विठ्ठल पायघन, मुरलीधर जाधव, अमोल भाकरे यांची उपस्थिती होती.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम गावंडे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post