आंब्याच्या झाडाला लागल्यात कैऱ्या, अतिक्रमणधारकांनी जगवले झाड, मानवाला मिळणार पाड




वाशिम जिल्हा प्रतिनिधी/प्रदीप देशमुख 


रिसोड तालुक्यातील रिठद येथील राज्यमार्ग क्रमांक ५१, वाशिम -रिसोड रस्त्यावरील अढळ नगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ राहत असलेल्या राजू राजे व त्याचा परिवार हे कुटुंब वैदू जातीचे असून पाण्याच्या टाकीजवळ अतिक्रमण जागेत राहत आहे.हे कुटुंब खेडोपाडी जाऊन बाळ्या, बुगड्याचा व्यवसाय करतात. व आपली उपजीविका चालवता. दिवसभर आपला व्यवसाय करून संध्याकाळी आपल्या मुक्कामी जागेत येऊन राहतात. येथील घरासमोरच आंब्याचे झाड लावले. त्या झाडाला मोठ्या प्रमाणात आंब्याची फळे लागली असून ही फळे त्यांना खाण्यासही मिळणार आणि उन्हाचा विसावा घेण्यासाठी सावली मिळणार अशा पद्धतीचे सर्वच लोकांनी अवलोकन केले तर जीवन सार्थकी लागेल. शरीराला अनेक जीवनसत्वाची गरज असते ती आंब्याच्या माध्यमातून मिळणार व सूर्याच्या उन्हापासून होणाऱ्या त्रासापासून सावली मिळणार! म्हणजेच आम के आम, गुटली के दाम या उक्तीप्रमाणे आयुष्य जगलं तर कुठेही आयुष्यात व पुढच्या पिढीला काही कमी पडणार नाही. निसर्गाचा समतोलही राखण्यात आपण यशस्वी होऊ व पुढच्या पिढीलाही त्याचा लाभ होईल. त्यामुळे प्रत्येकाने जीवनात अशा विचाराला प्राधान्य दिले तर आयुष्य सुखद होईल. हे मात्र तितकेच खरे !

Post a Comment

Previous Post Next Post