वाशिम रिसोड राज्यमार्ग क्रमांक ५१ या रस्त्यावर पांढरे पट्टे कधी दिसणार?




वाशिम जिल्हा प्रतिनिधी/प्रदीप देशमुख


वाशिम ते रिसोड राज्य क्रमांक ५१ या रस्त्याचे काम संबंधित ठेकेदारामार्फत काम चालू असून या रस्त्यावर खड्डे दुरुस्तीचे काम चालू आहे. दरम्यान या रस्त्यावर अगोदर असलेले पांढरे पट्टे हे वाहन चालवणाऱ्या चालकाला रात्रीच्या वेळेस दिसत होते. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनाच्या लाईट मुळे सद्यस्थितीत दिसत नाहीत. सध्या या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम चालू असून अगोदर असलेले पट्टे या नवीन




 डांबरीकरणाच्या कामामुळे झाकले गेलेले आहेत. त्यामुळे समोरून येणाऱ्या कोणत्याही वाहनाच्या लाईट मुळे आपण रस्त्याच्या मध्यावर आहोत की एका साईडला आहोत हे लवकर कळत नाही, किंबहुना काही वाहने मोटरसायकल असो किंवा चारचाकी वाहने रस्त्यावर पांढरे पट्टे नसल्यामुळे रस्त्याच्या खाली जाऊन अपघात होतात किंवा अनेक वाहने एकमेकांवर पट्टे नसल्यामुळे आढळतात व अपघात होतात. त्यामध्ये कुणाचाही जीव जाऊ शकतो!, करिता लवकरात लवकर वाशिम ते रिसोड राज्यमार्गावर रस्त्याच्या दोन्ही कडेला व मध्यंतरी पांढरा पट्टा लवकरात लवकर मारावा व लोकांचे जीवही वाचतील याबाबतची काळजी सार्वजनिक बांधकाम विभागाने घेऊन काम करणाऱ्या कंपनीने सुद्धा या बाबीकडे दुर्लक्ष करू नये लवकरात लवकर हे काम कसे होईल?, याबाबत कार्य हाती घ्यावे अशी या रस्त्यावरील प्रवाशांची मागणी आहे. व सोबतच रस्त्याच्या कडा सुद्धा मुरूमाने काही जागेवर भरणे गरजेचे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post