मंगलमूर्ती विद्याधाम रांजणगाव गणपती च्या एसएससी बॅच -२००९-१० चा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न
प्रतिनिधी -- अर्जुन शेळके
आज रविवार दिनांक 23/03/2025 रोजी मंगलमूर्ती विद्याधाम शाळेमध्ये माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केलेले होते. सदर कार्यक्रमानिमित्त माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्याकडून शाळेतील ग्रंथालयासाठी अकरा हजार रुपये किंमतीची ग्रंथसंपदा भेट देण्यात आली.तब्बल 15 वर्षानंतर शाळेत पुन्हा एकदा वर्ग भरला,धमाल, मस्ती,एकत्र येऊन केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा,शिक्षकांकडून मिळालेली शिक्षा,स्नेहसंमेलन व विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणीना उजाळा मिळाला.माजी उपसरपंच आकाश बत्ते, अँड.अतुल खेडकर, भाजपा पुणे जिल्हा विद्यार्थी आघाडी प्रमुख हर्षद जाधव,वर्ल्ड फिटनेस क्लब संस्थापक दिगंबर फंड,सागर लांडे,दिगंबर खेडकर, विजय साळुंके, अतुल बत्ते, विजय खेडकर, अक्षय गलांडे, विक्रम खेडकर,यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रमाचे सर्व नियोजन केले. या मेळाव्यात एकूण 53 माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.
कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक थोरात सर, पर्यवेक्षक सुभाष पाचकर, मा. मुख्याध्यापक ब्राह्मणे सर,तुकाराम फंड, अशोक शेळके,दत्तात्रय भुजबळ, नंदकुमार अनारसे, आर.टी.शिंदे,सतिष झांबरे, कौठाळे सर,सुनिल लांडे आदी गुरुजन उपस्थितीत होते. तसेच सुनील कुटे , चेतन गलांडे, विक्रम खेडकर, अक्षय खेडकर, मनोज माळवदकर, चेतन शेळके, अजित खेडकर, नंदू खेडकर, विश्वास भुजबळ, सचिन टेमगिरे, प्रमोद खेडकर, सचिन खेडकर, चेतन गलांडे, विशाल बत्ते, अतुल पाचुंदकर, आकांक्षा शेळके,भारती कुटे,काजल लांडे, निर्मला पाचुंदकर ,अस्मिता जाधव, शिल्पा लांडे, राजेश्वरी लांडे, प्रियांका खरमाळे, प्रियांका साळुंके, कोमल खेडकर,पुजा खेडकर, चैताली खेडकर, वृषाली पाचुंदकर,स्वाती शेलार,कोमल दरेकर, राणी खेडकर, प्रियांका खेडकर,विजया खेडकर, स्नेहल खेडकर, पल्लवी शिंदे, पुजा लांडे, शुभांगी फंड,गीता चौरसिया, जयश्री लांडे,मंगल लांडे व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमानिमित्त अनेक विद्यार्थी तसेच शिक्षकांनी मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्तविक अँड अतुल खेडकर व सूत्रसंचालन सिने अभिनेते लक्ष्मण मांढरे यांनी केल तर आभार हर्षद जाधव यांनी मानले.
