नागरिकांनी उष्णलाटेच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काळजी घेणे गरजेचे ; डॉ. अशोक पांडुरंग इंगोले
वाशिम ; जागतिक तापमान वृद्धी, पर्यावरणीय बदल, आणि हवामानातील अनिश्चितता लक्षात घेतल्यास. वैज्ञानिक अंदाज आणि संशोधनानुसार, उष्णलाटेच्या प्रकरणात वाढ होण्याची शक्यता आहे, आणि त्याचे परिणाम सर्वांगीण आणि दीर्घकालीन असू शकतात. त्या मुळे वाढत्या उष्णतेमुळे होणारे परिणाम आणि त्यासाठी घेण्याची काळजी अत्यंत महत्त्वाची आहे. उष्णलाट किंवा अत्यधिक तापमानामुळे शरीरावर विविध प्रकारचे परिणाम होऊ शकतात. यामुळे आरोग्य, पर्यावरण, आणि जीवनशैलीवर मोठा प्रभाव पडतो. शारीरिक आरोग्यावर परिणाम होत उष्माघात (Heat Stroke) उच्च तापमानामुळे शरीराचा तापमान नियंत्रण प्रणाली निकामी होऊ शकते, ज्यामुळे उष्माघात होतो. यामध्ये उच्च तापमान, डोकेदुखी, उलट्या, आणि शारीरिक थकवा दिसून येतो. गंभीर अवस्थेत, यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.डिहायड्रेशन (Dehydration) उष्णतेमुळे शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स गमावले जातात. डिहायड्रेशनमुळे चक्कर येणे, थकवा, आणि मेंदूचे कार्य कमी होऊ शकते.उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी झाल्यास, तापमान नियंत्रण प्रणाली कमी प्रभावी होते, ज्यामुळे मांसपेशींचा थकवा, जड श्वास, आणि हायपरटेंशन होऊ शकतात.
उष्णतेमुळे मनोबलावर देखील परिणाम होऊ शकतो. गरमीमुळे तणाव वाढतो, चिडचिडेपणामध्ये वाढ होते, आणि मानसिक ताणाचा अनुभव होतो. मानसिक दडपणामुळे निर्णय घेण्यात अडचणी येऊ शकतात आणि कार्यक्षमता कमी होऊ शकते.
जलस्रोत कमी होने उष्णतेमुळे पाण्याच्या स्त्रोतांची गळती होऊ शकते, आणि पाणी बचतीची समस्या निर्माण होऊ शकते.कृषी उत्पादनांवर परिणाम अधिक उष्णता आणि कमी पाऊस यामुळे कृषी उत्पादनांवर परिणाम होऊ शकतो. मुख्यतः गहू, भात आणि मका यांसारख्या पिकांची उत्पादकता कमी होऊ शकते.
प्राकृतिक आपत्तींचे प्रमाण वाढणे:
वाढत्या तापमानामुळे जंगलांच्या आगीत आणि नैसर्गिक आपत्त्यांमध्ये वाढ होऊ शकते. उष्णतेमुळे हवा वाळवंटाच्या दिशेने वाहू लागते, ज्यामुळे जंगलांमध्ये आग लागण्याची शक्यता वाढते. या सर्व बाबींची आपण दक्षता घेणे हे या उष्णतेच्या लाटेमध्ये गरजेचे आहे. आपणास आव्हान करीत सांगण्यात येते की आपण जास्तीत जास्त संख्येने वृक्षारोपण, पशुपक्षी यांच्यासाठी पाणी पात्रांची व्यवस्था, पर्यावरण संवर्धन,जलसंवर्धन करण्याकरिता अधिक भर द्यावा
*काळजी घेण्यासाठी उपाय*
1. पाणी आणि द्रव पदार्थांचे प्रमाण वाढवणे उष्णतेच्या वेळी अधिक पाणी पिणे आवश्यक आहे. फळांचे रस, निंबू पाणी, आणि सोडियमयुक्त पेये (जसे कि शिकंजी) शरीरात आवश्यक द्रवांचा समतोल राखतात.
2. सावलीत राहणे गरम हवामानात बाहेर जाण्याचा प्रयत्न टाळा. घरामध्ये किंवा छायेत राहून उष्णतेपासून बचाव करा.
3. हलके कपडे घालणे: त्वचेला श्वास घेण्याची सुविधा देणारे हलके आणि फिके रंगाचे कपडे घालावेत. उष्णतेला शरिरावर थंडावा मिळावा म्हणून सूती कपड्यांचा वापर करा.
4. उष्माघात आणि डिहायड्रेशनच्या लक्षणांवर लक्ष ठेवा: शरीर थकल्यास, डोकं दुखल्यास किंवा उलट्या झाल्यास त्वरित उपचार घेण्याची आवश्यकता आहे.
5. उन्हात अधिक वेळ न घालवणे: दिवसभरात ११ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत बाहेर न जाणे, या वेळात सूर्यप्रकाशाचा ताण अधिक असतो.
6. गॅझेट्स आणि वीज वापराचे व्यवस्थापन: वीज खपत नियंत्रित करा, वीजच्या अधिक वापरामुळे उष्णतेचा आणख इफेक्ट होऊ शकतो.
7 . शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील धुरे बंधारे अथवा पडीत जमिनीला आग रणवा लावणे टाळावे. मधमाशांच्या दंशापासून सावधानगिरी बाळगावी.
8.अपघात स्थळी नागरिकांना मदत करा त्यांना हॉस्पिटल पर्यंत पोहोचवा
डॉ. अशोक पांडुरंग इंगोले
---------------------------------------------
