रांजणगाव गणपती येथे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधीष्टीत शिल्पाचे अनावरण व लोकार्पण सोहळा
प्रतिनिधी : अर्जुन शेळके
तीर्थक्षेत्र रांजणगाव गणपती.ता.शिरूर जि.पुणे येथे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे आकर्षक स्मारक साकारले आहे .या स्मारकाचे व परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे यामुळे शिवछत्रपतींचा दिमाखदार सिंहासनाधीष्टीत पुतळा शिवप्रेमींचे आकर्षण व प्रेरणास्थान ठरणार आहे. या शिवस्मारकाचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा फाल्गुन कृ.३ सोमवार दिनांक १७/०३/२०२५ रोजी सायंकाळी
सहा वाजता ग्रामपंचायत व्यापारी संकुल शेजारी रांजणगाव गणपती येथे संकष्टी चतुर्थी व श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा योग साधून श्रीमंत युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील माजी सहकारमंत्री व विद्यमान आमदार शिरूर आंबेगाव विधानसभा तर प्रमुख उपस्थिती नामदार अमोलजी कोल्हे खासदार शिरूर लोकसभा, नामदार शिवाजीराव आढळराव पाटील माजी खासदार, माननीय माऊली आबा कटके आमदार शिरूर हवेली, माननीय अशोक बापू पवार माजी आमदार शिरूर हवेली यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
सदर कार्यक्रम हा दोन दिवस चालणार असून फाल्गुन कृ.२ रविवार दिनांक १६/०३/२०२५ सकाळी ९ ते१२ वा. पूजा होम हवन व दुपारी २ ते६ वा. श्रींच्या मूर्तीचा महाभिषेक तसेच फाल्गुन कृ.३ सोमवार १७/०३/२०२५ सकाळी ८:३० ते ११ वा.श्रींची मूर्ती प्रतिष्ठापना सकाळी ११ ते ३ वाजता श्रींची
माहिती ,पोवाडे, गाणी दुपारी ३ ते ५ वाजता श्रींची पालखीतून भव्य मिरवणूक सोहळा ढोल ताशे हलगी वादन इ. सायंकाळी ५ ते ६ वाजता श्रींचा पोवाडा गायन सोहळा शाहीर सानप सातारा साय. ६ वाजता प्रमुख पाहुणे आगमन पाहुण्यांच्या शुभहस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पाचा भव्य लोकार्पण सोहळा फटाके आताषबाजी सायंकाळी ६:३० ते ७ वाजता प्रमुख पाहुणे स्वागत सत्कार व पाहुण्यांचे मनोगत इत्यादी भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन आहे. शिवशाही प्रतिष्ठान निर्मलग्राम ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ यांनी ह्या सिंहासनाधीष्टीत उभारलेल्या शिवछत्रपतींच्या शिवस्मारकामुळे गावच्या वैभवात भर पडणार असून शिवप्रेमी तरुण व ग्रामस्थांमध्ये उत्सवाचे वातावरण आहे.
या दिवशी पारंपारिक शिवजयंतीचे औचित्य साधून ग्रामस्थांनी जमवलेल्या निधीतून येथील शिवस्मारकाचे काम आता पूर्ण झाले आहे. सदर काम पूर्ण झाल्यामुळे परिसराचा कायापालट झाला आहे.
