सौ.सीमा प्रकाश राठोड महानायक वसंतराव नाईक समाज रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.सीमा प्रकाश राठोड महानायक वसंतराव नाईक समाज रत्न पुरस्काराने सन्मानित


 स्थानिक मालेगाव येथील काळामाथा मंदिरामध्ये अखिल भारतीय तांडा सुधार समिती व बंजारा समाजाच्या वतीने सौ सीमा प्रकाश राठोड गोरनायकण उपाध्यक्ष महाराष्ट्र यांचा महानायक वसंतराव नाईक समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले मालेगाव तालुक्यातील काळा माता



 मंदिरामध्ये बंजारा समाजातील लेंगी नृत्य महोत्सव होळी निमित्त आयोजित करण्यात आले होते विविध जिल्ह्यातून असंख्य बंजारा बंधू-भगिनी आपापल्या वेशभूषेमध्ये लेंगी नृत्य सादर करून बंजारा समाजाची संस्कृती ची जतन करण्याचा प्रयत्न करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रसंगी माननीय आमदार अमित भाऊ झनक माननीय समाजाचे धडाडीचे नेतृत्व दिलीप भाऊ जाधव माननीय जय किशन भाऊ राठोड तसेच समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सौ सीमा


 राठोड यांना सन्मानपत्र आणि शील्ड समाज रत्न पुरस्कार देऊन तसेच शाल श्रीफळ आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला समाज सेविका म्हणून समाजाकरिता शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक संघटन अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या सौ सीमा राठोड यांना महानायक वसंतराव नाईक समाज रत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला

 कार्यक्रमाच्या सुंदर आयोजन माननीय प्राध्यापक डॉ विजय जाधव अध्यक्ष अखिल भारतीय तांडा सुधार समिती महाराष्ट्र तसेच महासचिव माननीय श्रावण भाऊ जाधव अखिल भारतीय तांडा सुधार समिती महाराष्ट्र यांच्या अथक परिश्रमाने बंजारा लेंगी नृत्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला बंजारा समाजातील बहुसंख्य महिला आणि पुरुष मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post