शिरूर प्रतिनिधी अर्जुन शेळके
शिक्रापूर..15 मार्च
शिरुर तालुका पदवीधर शिक्षक संघटनेमार्फत जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान मातांना आदिशक्ती पुरस्कार ,उपक्रमशील शिक्षकांना स्व.धर्मराज कर्पे शिक्षकरत्न पुरस्कार व आदर्श शाळा यांचा गौरव करताना शिक्रापूर येथे संपन्न कार्यक्रमात पुणे जिल्ह्याच्या निवासी जिल्हाधिकारी सौ. समीक्षा गोकुळे यांनी वरील मत व्यक्त केले. मंदिरात दर्शन करून आल्यावर जे समाधान मिळतं ते समाधान या कार्यक्रमातून मला मिळालं. पदवीधर शिक्षक संघटनेने कर्तृत्ववान महिलांचा संपूर्ण परिवारासह अनोख्या पद्धतीने केलेला सन्मान मनाला भावला असल्याचे त्यांनी सांगितले.
जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमात १२ माता,१६ शिक्षक, २ आदर्श शाळा यांना गौरविण्यात आले.
बालरंगभूमी अध्यक्षा सौ. दिपाली शेळके, यांनी आपल्या मनोगतात जागतिक महिला दिन साजरा करताना महिलांनी दीन न राहता स्वतःतील राजहंस शोधून आपल्यातील अव्यक्त क्षमतांचे दार उघडून यशाची उंच भरारी घेण्याइतपत सक्षम व्हा,असे सांगितले. डॉ.कल्पना पोकळे यांनी आपले विचार मांडले.
यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल पलांडे यांनी संघटनेचे कार्य, राबवित असलेले विविध उपक्रम, करपे गुरुजींच्या प्रेरणादायक आठवणी यांवर प्रकाश टाकला.
यावेळी एक्सेल ऑटोव्हिस्टा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे जनरल मॅनेजर दीपक कडू,रोहिदास गव्हाणे, संघटनेचे आधारवड सोपानराव धुमाळ, केंद्रप्रमुख रामदास विश्वास, विस्तार अधिकारी राजेंद्र टिळेकर, सखाराम फंड, त्रिंबक भाकरे, पोपट गांधले, युवराज थोरात, अशोक कर्डीले
एनपीएस अध्यक्ष हनुमंत वाळुंज माजी चेअरमन विजय गोडसे, संतोष विधाटे, चंद्रकांत खैरे यासह शिरुर शिक्षक पतसंस्थेचे अनेक संचालक , संघटनेच्या मा.जिल्हाध्यक्षा सुप्रिया नवले माजी चेअरमन वंदना पाचर्णे, स्वाती करपे, श्वेता करपे, माजी अध्यक्षा मानसी थोरात, अंजली शिंदे एनपीएस अध्यक्षा सुशीला बोखारे , संघटना पदाधिकारी, आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुढील पुरस्कार वितरण करण्यात आले.
*संघटनात्मक जीवन गौरव पुरस्कार*
श्री.म्हतारबा महादू बारहाते
*आदर्श माता पुरस्कार*
१)सौ. सुशीला बबनराव वारे.
२) सौ. मंगल मच्छिंद्र पाचर्णे
३)श्रीम.रोहिणी रमेश ढवळे.
४)श्रीम.लक्ष्मीबाई महादू शेळके.
५)सौ. कांताबाई जयसिंग लगड .
६) सौ. सुमन दत्तात्रय फुंदे
७) सौ.शकुंतला शिवाजी थोरात
८)सौ. विठाबाई रामदास बारवकर .
९) सौ.तारामती शिवाजीराव धुमाळ
१०)श्रीम.कांताबाई जयवंत दौंडकर
११) श्रीम. गंगुबाई बाळू पवार
१२)सौ. लक्ष्मीबाई आनंदा रासकर
*आदर्श शिक्षिका..*
१३) सौ. मंगल किसन शिंदे
१४) सौ.शैलजा सूर्यकांत टाकळकर
*आदर्श शाळा*
जि प प्राथमिक शाळा सोनखिळा (आंबळे )
जि प प्राथमिक शाळा तळेगाव
*शिक्षक रत्न पुरस्कार*
१) सौ. स्वाती सुनिल जासूद.
२)सौ.अनुराधा बापूसाहेब गट
३) हुमेरा खातूम सय्यद
४) सौ. संगीता संभाजी जगताप.
५)सौ.सीमा विजय कुंभार
६) श्री.पोपट बाबुराव रासकर
७)श्री.श्रीकांत नरसय्या सुंकरवार.
८)श्री. महेश भिमराव लहाने
९) श्री.संतोष भाऊसाहेब बनकर
१०)श्री. सुधीर तानाजी बेंद्रे
११)श्री. सचिन सोपान खेडकर. ..क्रीडा प्रशिक्षक आणि क्रिकेटपटू.
१३)सौ.अरुचना गणेश मांढरे.. शिष्यवृत्ती मार्गदर्शक(५ वी)
१४)सौ.जयश्री सुनिल पलांडे..शिष्यवृत्ती मार्गदर्शक (८ वी)
१२)कु.विशाखा विठ्ठल देशमुख.. मल्लखांब खेळाडू (राष्ट्रीय स्तर)
यांना सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. महिलांचे आरोग्य या विषयावर डॉ. स्वाती पानगे यांनी व्याख्यानातून मोलाचे मार्गदर्शन केले. महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मानाची पैठणी शिक्षिका सविता खेडकर यांनी जिंकली. माधुरी संकपाळ, रेखा थोरात या उपविजेत्या स्पर्धकांना आणि सहभागी महिलांना विविध बक्षिसे देण्यात आली.
सर्वांचे स्वागत तालुकाध्यक्ष कल्याण कोकाटे यांनी केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आघाडी अध्यक्षा शोभा तिकांडे यांनी सूत्रसंचालन तर पोपट इंगवले,खंडेराव होळकर आणि आभार तालुका सरचिटणीस मिलिंद आबनावे आणि विलास पुंडे यांनी मानले.
कार्यक्रमास विशेष सहकार्य एक्सेल ऑटो विस्टा कंपनीने दिले.
