रांजणगाव येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळ्याचा अनावरण व लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न




प्रतिनिधी : अर्जुन शेळके


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण सोहळा रांजणगाव गणपती येथे श्रीमंत युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यात शिवप्रेमींचा उत्साह पाहण्यास मिळाला त्यानिमित्ताने युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी उपस्थितांशी संवाद साधला सरकार ने श्रीमान किल्ले रायगड मॉडेल प्रमाणे गड -किल्ले संवर्धन करण्यासाठी पावले उचलावीत तसेच कोणाचाही कार्यक्रमात नामउल्लेख न करण्याच्या संयोजकांच्या निर्णयाचे स्वागत केले त्यामुळे गावचा एकोपा दिसून येतो छत्रपतींचे विचार सोबत घेऊन कार्य करणाऱ्या शिवप्रेमी यांच्यासाठी ही प्रेरणा देणारी बाब आहे असे गौरवउद्गार छत्रपती यांनी काढले .



शिवशाही प्रतिष्ठानच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधीष्ट शिल्पाची उभारणी करण्यात आली त्यावेळी ना.दिलीपराव वळसे पाटील यांच्या सुविद्य पत्नी किरणताई वळसे पाटील ,अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा . डॉ .एकनाथ खेडकर ,सरपंच सुवर्णाताई वायदंडे, उपसरपंच श्रीकांत आबासाहेब पाचुंदकर  व पीआय महादेव वाघमोडे साहेब शिरूर आंबेगाव अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर शिवसेना युवाप्रमुख पुणे बापूसाहेब शिंदे राजमुद्रा.चेअरमन दत्तात्रय पाचुंदकर पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर मा सरपंच सर्जेराव खेडकर उद्योजक महेश फंड प्रताप फंड नारायण पाचुंदकर विश्वस्त ओमकार देव  मा उपसरपंच राहुल पवार उद्योजक विवेकानंद फंड सह निर्मल ग्रामपंचायत रांजणगाव गणपतीचे सर्व आजी-माजी सदस्य सोसायटीचे सर्व संचालक व चेअरमन व्हाईस चेअरमन तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष पोलीस पाटील आणि सर्व उपस्थित शिवभक्त त्यांच्या सर्व टीमने चोख बंदोबस्त ठेवला होता शुभस्य डेकोरेटरचे आकाश साळुंखे यांनी संपूर्ण सजावट व इतर संपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली कार्यक्रमात शाहीर सानप सातारा यांच्या पोवाड्याने रंगत आणली व्यासपीठावर जेष्ठ मंडळी उपस्थित होती


कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा . माणिक खेडकर व सूत्रसंचालन रोहिदास खेडकर व आभार अजय गलांडे मा .उपसरपंच ग्रा.पं.  रां .ग यांनी मानले.

 सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भानुदास शेळके, नेताजी फंड ,नितीन (काका) लांडे ,अनिलराव शेळके, सतीश वाघुले, सतीश क्षिरसागर, शिवशाही प्रतिष्ठान सर्व सदस्य, निर्मलग्राम ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ रांजणगाव गणपती व आजी-माजी पदाधिकारी यांनीविशेष सहकार्य केले यावेळेस सर्व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते





युवराज छत्रपती संभाजी राजे ---



"राजंणगाव अष्टविनायकां पैकी महागणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजंणगावा मध्ये, शककर्ते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या  सिंहासनारुढ  स्मारकाचे लोकार्पण होत आहे, ही संपूर्ण शिवप्रेमींसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे!


शिवरायांनी घडवलेला इतिहास हा केवळ पुस्तकांत बंदिस्त नाही, तर तो रक्तात भिनलेला तेजस्वी स्वाभिमान आहे. त्यांच्या तलवारीची धार, मनगटातली ताकद, आणि न्यायासाठीचा लढा, ही आपल्या सर्वांची खरी ओळख हवी.

महाराजांनी शिकवलेली स्वाभिमानाची आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण, आजच्या काळातही तितकीच गरजेची आहे. महाराजांचा  सत्य इतिहास नव्या पिढीला समजवण्यासाठी सामुहिक प्रयत्न झाले पाहीजेत असे गौरवोद्गार छत्रपती संभाजी राजे यांनी सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांमध्ये केले

Post a Comment

Previous Post Next Post