डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने मेहकर येथे मोठ्या उत्साहात साजरी..

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने मेहकर येथे मोठ्या उत्साहात साजरी..



मेहकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तथागत ग्रुपच्या वतीने मेहकर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाटिका येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मार्गदर्शक भाई कैलास सुखधाने, तौफिकभाई कुरेशी, तथागत ग्रुप महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्षा सौ.आरती दिक्षित,ज्येष्ठ पत्रकार फिरोजभाई शहा, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीपभाऊ गवई यांनी पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी, तथागत ग्रुपचे मार्गदर्शक भाई कैलास सुखधाने व सौ.आरती दिक्षित यांनी आपल्या संबोधनात म्हणाले की, प्रत्येकांनी महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आत्मसात करुन समाजात बंधुत्व व समताधिष्ठीत समाजाची भावना निर्माण करावी. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची जाणीव करुन घेणे हि काळाची गरज आहे असे विचार व्यक्त केले.



यावेळी भाई कैलास सुखधाने, तौफिकभाई कुरेशी, ज्येष्ठ पत्रकार फिरोजभाई शहा, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदिप गवई, कुणाल माने, अफ्रोज अली, फिरोज , अख्तर कुरेशी, संदिप राऊत, तथागत अतार, महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्षा सौ.आरती दिक्षित, आसमा आत्राम, कांचन मोरे, वंदना माने, निता पैठणे यांच्यासह तथागत ग्रुपचे मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सर्व समाजातील, तसेच विविध क्षेत्रातील मित्र परिवार उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post