प्रहार जनशक्ती पक्षाची पुणे जिल्हा कार्यकारिणी जाहीरप्रहार उपजिल्हा अध्यक्ष पदी राहुल वाळके यांची निवड...



    आज दिनांक 14 एप्रिल रोजी माननीय बच्चू कडू साहेब (पक्षांध्यक्ष) यांच्या आदेशाने अनेक दिवस प्रलंबित असणारी पुणे जिल्हा प्रहार कार्यकारिणी मी जाहीर केली.

    जुने नवीन अश्या सर्व प्रामाणिक कार्यकर्त्यांना एकत्र करून नव्या दमाने प्रहार पुन्हा उभे राहत आहे.    प्रहारचा सेवाभाव,सामाजिक व राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात उभे करण्याच्या दृढ निश्चयाने सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी काम करतील.

 आज प्रामुख्याने पुणे जिल्हा, तालुका, व पुणे शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. पुढे देखील पदास न्याय देतील अश्या योग्य व्यक्ती करिता प्रहार पक्ष खंबीरपणे सोबत उभे करेल असे देखील जाहीर करण्यात आले.

   प्रसंगी सोबत श्री.महेश बडे (राज्य अभियान प्रमुख) श्री. गौरव जाछव (राज्य समन्वयक) उपस्थितीत होते.. नवं नियुक्त जिल्हाउपाध्यक्ष राहुल वाळके  यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे स्वागत व आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post