यशवंतराव चव्हाण सैनिकशाळेला स्वच्छता मूल्यांकन समितीची भेट



 वाशिम तालुका प्रतिनिधी :- स्थानिक सुखखेला येथील यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेत महात्मा गांधी रिसर्च फाउंडेशन स्वच्छता मूल्यांकन समितीची भेट झाली मुलांमध्ये स्वच्छतेचे मूल्य तसेच स्वच्छतेचे संस्कार रुजवणे काळाची गरज आहे आजचा विद्यार्थी प्रगत भारताचा सुजाण नागरिक आहे त्याला स्वच्छता आणि पर्यावरण विषयक गोडी निर्माण व्हावी याकरिता गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव यांच्यावतीने आयोजित केल्या जाणाऱ्या गांधी तीर्थ स्वच्छ शाळा




 राज्यस्तरीय प्रतियोगिता 2024/25 साठीच्या परीक्षणाकरिता यशवंतराव चव्हाण सैनिक शाळा सुपखेला,वाशिम येथे भेट देण्यात आली परीक्षणासाठी मा.गिरीश कुलकर्णी मा.चंद्रशेखर पाटील मा.संजय जाधव यांनी गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिते अंतर्गत शाळेचे अंतिम मूल्यांकन केले आहे.या समितीने शाळेतील विविध उपक्रमाची पाहणी केली.नाविन्यपूर्ण उपक्रमातील सहभागी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांच्याशी संवाद साधला गिरीशजी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व आपल्या मार्गदर्शनात समजावून सांगितले यावेळी मंचावर शाळेचे प्राचार्य एम एस भोयर उपप्राचार्य एस बी चव्हाण स्पर्धा आयोजक समन्वय पी पी पोळकट सदस्य एस एस मोळके एन.ए.पडघान एम एन वानखेडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी.टी.मोरे यांनी केले तर आभार एस एस मोळके यांनी मानले संबंधित कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी बहुसंख्येने आवर्जून उपस्थित होते असे प्रसिद्धी प्रमुख रमेश रावसिंग पडवाळ यांनी कळविले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post