रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये वाहन पार्किंग संदर्भात पोलीस व कंपनी प्रतिनिधींची बैठक संपन्न

 रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये वाहन पार्किंग संदर्भात पोलीस व कंपनी प्रतिनिधींची  बैठक संपन्न 

    


Shirur प्रतिनिधी - अर्जुन शेळके



     शिरूर तालुक्यातील रांजणगाव - कारेगाव एमआयडीसी लगत असणाऱ्या ढोकसांगवी गावातील कैलास चंदर पाचंगे, यांचा दि. 18 फेब्रुवारी 2018 रोजी अपघात झाला होता. त्यात त्यांच्या डोक्याला व मेंदूला जबर मार लागल्याने, त्यांना पुणे येथील जहांगीर हॉस्पिटल येथे दाखल करून उपचार करण्यात आले होते. त्यात त्यांना बारा लाख रुपये खर्च झाला होता. हा अपघात होण्याचे कारण म्हणजे, झामील स्टील इंडस्ट्रीज या कंपनीत आलेला ट्रक हा नो पार्किंगमध्ये उभा केलेला होता. त्याला रेडियम व रिफ्लेक्टर नसल्याने हा अपघात झाल्याचा आरोप संबंधितांनी केलेला होता. असे अपघातांचे प्रकार त्या अपघातापासून अनेकदा झालेले होते. त्यामुळे आमच्याबाबत जो अपघाताचा प्रकार झाला, तसा इतरांबाबत होऊ नये व बाकीच्यांना रुग्णालयाचा आर्थिक भुर्दंड होऊ नये, यासाठी पाचंगे कुटुंबीयांनी 1 सप्टेंबर 2021 रोजी एमआयडीसी कडे तक्रार अर्ज दिलेला होता. त्यानुसार एमआयडीसी कार्यालयाने रांजणगाव पोलीस स्टेशनला 6 सप्टेंबर 2021 रोजी पत्र देत संबंधित अवैध्यरीत्या पार्किंग केलेली वाहने आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले होते.


     त्यानंतर अपघातग्रस्त कैलास पाचंगे यांचे बंधू व भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशचे अध्यक्ष काशिनाथ पाचंगे यांनी शिरूर तहसीलदारांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे तत्कालीन तहसीलदार यांनी संबंधित पोलिस स्टेशनला या तक्रारीची दखल घेण्यास सांगत, संबंधित बेशिस्त वाहनांवर कडक कारवाई करण्यास 17 मार्च 2022 रोजी दिलेल्या पत्रात सांगितले होते. परंतु तरीही तशी कारवाई न झाल्याने संघटनेच्या वतीने काशिनाथ पाचंगे, महीलाध्यक्षा प्रियंका जगताप व इतर पदाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत, त्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाने या आंदोलनाची परवानगी नाकारत पुन्हा तहसीलदार व एमआयडीसी कार्यालय, तसेच पोलीस स्टेशनला त्यांच्या पातळीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 


     मात्र वेळोवेळी संबंधित सर्व कार्यालयांना पत्र देत, प्रत्यक्ष भेटी व बैठका होऊनही, अद्याप 2025 उजाडले तरीही संबंधित कंपन्यांनी, त्यांच्या अवजड वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न न मिटवल्याने शेवटी ढोकसांगवी ग्रामस्थांनी व ग्राम पंचायतच्या ग्रामसभेत, दि. 07/07/2023  रोजी या वाहनांच्या अवैध्य पार्किंगचा प्रश्न मांडत ठराव संमत केलेला होता. 

     त्यानंतरही हा प्रश्न न मिटल्याने व दरम्यानच्या काळात पुन्हा बे एके बे सुरू राहिल्याने व आम्हा ढोकसांगवी ग्रामस्थांना न्याय न मिळाल्याने, पुन्हा संबंधित सर्व कार्यालयांना पत्रव्यवहार आम्ही केले आहेत असे पाचंगे यांनी सांगितले. त्यानंतर पुन्हा ग्राम पंचायतचा ग्रामसभेत 03/02/2025 रोजी ठराव घेण्यात आला.

    त्या अनुषंगाने शुक्रवार दि. 18/04/2025 रोजी रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी संबंधित कंपनीचे प्रतिनिधी व तक्रारदारांची बैठक घेतली. त्यास झामील स्टील, बेजल, गृपो अँटोलीन, फियाट, टाटा स्टील ई. कंपनी प्रतिनिधी उपस्थित होते.

   आता या बैठकीनंतर नेमक्या काय कारवाया होतील ? हे पाहणे गरजेचे आहे.

     दरम्यान याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले की, "काशिनाथ पाचंगे व प्रियंका जगताप यांनी पोलीस स्टेशनला दि. 17 फेब्रुवारी 2025 रोजी पार्किंग संदर्भात निवेदन दिले होते. त्यास ढोकसांगवी ग्रामपंचायतचा ग्रामसभेचा ठराव लावलेला होता. या ठरावात असे नमूद केले होते की, टाटा चौक ते ढोकसांगवी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहनांच्या पार्किंगची समस्या निर्माण होत आहे, त्याबाबत कार्यवाही होणेबाबत सांगितलेले होते. त्यानुसार आम्ही आज शुक्रवार दि. 18 एप्रिल 2025 रोजी, संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींना बोलावून त्यांच्या समक्ष बैठक घेतली असून, या बैठकीस उपस्थित प्रतिनिधींना पार्किंगबद्दल सूचना करून, जर चुकीच्या दिशेने गाड्यांची वाहतूक आढळली, अपघातास कारणीभूत अशा प्रकारच्या वाहनांच्या पार्किंग आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, तसेच संबंधित कंपन्यांनी त्यांच्या पार्किंगसाठी पार्किंग मार्शल ची व्यवस्था करावी, कंपनीच्या गेट पासून ठराविक अंतरापर्यंत वाहने लावू नयेत. शेजारील गावांमध्ये जाणाऱ्या येणाऱ्या ग्रामस्थांच्या वाहनांना अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. अशा सूचना य बैठकीत संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींना देण्यात आलेल्या आहेत.



चौकट -- बेशिस्त वाहन चालकांनी वाहन पार्किंग करून अनेक वेळा अपघात झाले असून त्यावरती उपाय म्हणून यापुढील काळात अशा वाहन चालकांना शिस्त लागण्यासाठी कठोर कारवाई व्हावी या पुढील काळात रस्ते खुले करून अपघात टाळावे जर बेशिस्त वाहन चालकांना लगाम लागला नाही तर आमरण उपोषणाचा पर्याय अवलंबला जाईल-काशिनाथ पाचंगे(भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश मोर्चा) / प्रियंका ताई जगताप

Post a Comment

Previous Post Next Post