शार्टसर्किटमुळे आग, दोन लाखाचे नुकसान हळदा येथील घटना

 




प्रतिनिधी प्रदीप देशमुख

मानोरा :-- तालुक्यातील हळदा येथील प्रवीण गायकवाड यांच्या शेतातील गोठ्याला शार्ट सर्किट मुळे आग लागून म्हैस आगीत होरपळून मृत्यू झाला. स्पिनकलर सेट, तोटी, वायर, शेती उपयोगी कृषी साहित्य,स्प्रे पंप, ताडपत्री आदी साहित्य आगीत जळून खाक झाल्याने दोन लाखाचे नुकसान झाल्याची तक्रार गायकवाड यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.


मानोरा तालुक्यातील हळदा येथील शेतकरी प्रवीण गायकवाड यांचे कडे चार एकर शेती असून शेतात त्याने गुरा करिता गोठा बांधला असून यात गाय, म्हैस, बैला ची व्यवस्था केली असून या गोठ्यात गुरा करिता चारा साठवून ठेवला आहे. प्रवीण गायकवाड याने १९ एप्रिल ला गोठ्यातून दूध काढून घरी गेला असता त्याच्या गोठ्याला आग लागल्याची माहिती मिळताच तो एका मित्राला सोबत घेऊन घटना स्थळी दाखल झाला




 गोठ्यातील गाय, बैल यांचे गाळे विळ्याने तोडले मात्र म्हैस आगीत होरपळून गेल्याने तिचा मृत्यू झाला. विहिरी वरून पाईप लाईन मार्फत पाणी गोठ्याकडे आणून आगीवर नियंत्रण मिळविले मात्र गोठ्यातील कुटार, ताडपत्री, स्पे पंप, स्पिनकलर सट, तोटी, शेतीची लाकडी कृषी अवजार, आगीत जळून खाक झाले तर म्हैस आगीत होरपळून मृत्यू झाल्याने गायकवाड यांचे दोन लाख रुपयाचे नुकसान झाले. शासनाने नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी असी मागणी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post