प्रतिनिधी -शिरूर
वाघोली दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास महाराष्ट्र राज्य मंडळाचे मंत्री व त्यासोबत विधानपरिषद उपसभापती नीलम ताई गोऱ्हे वाघोली येथे किडीलॅडस प्री स्कूलच्या भव्य शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहणार असून याप्रसंगी अनाथ मुले व गरजू विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे मंत्र्यांच्या हस्ते वाटप होणार आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या महिला अध्यक्ष सारिका ताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होत असून स्कूल उद्घाटना अगोदर मंत्री भरत गोगावले व विधान परिषद उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांच्या हस्ते वाघेश्वर मंदिर मध्ये अभिषेक सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्यासाठी शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके त्याचप्रमाणे मा जि सदस्य रामभाऊ दाभाडे हे उपस्थित राहणार असून पुणे जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार आहे
विधानसभा निकाला पूर्वी शिरूर लोकसभा महिला अध्यक्ष सारिका पवार यांनी आपल्या लाडक्या भावाच्या विजयासाठी व कॅबिनेट पदासाठी विशेष असे इच्छा व्यक्त केली होती याच इच्छापूर्तीसाठी महा अभिषेकाचे भव्य नियोजनाचे आयोजन केल्याचे पवार यांनी सांगितले त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील व मंत्री गोगावले यांच्या खात्याशी निगडित छोटे-मोठे निवेदन मंत्री गोगावले स्वीकारणार असून या माध्यमातून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ती कामे मार्गे लागणार असल्याचे बोलले जात आहे

