शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाची सरकारला जागे करण्यासाठी ट्रॅक्टर रॅली




 वाशिम जिल्हा प्रतिनिधी प्रदीप

 देशमुख


रिसोड:-दि.२ मे २०२५ रोजी हजारों ट्रॅक्टरांचा मोर्चा शेतकरी काढणार आहेत. 


खासदार संजय देशमुख, संपर्क प्रमुख दिलीप जाधवांचे नेतृत्वाखाली


 मुळात कृषी प्रधान असलेला, वाशिम जिल्हा आकांक्षीत असून वाशिम जिल्ह्यातील आर्थिक दृष्ट्या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी. ज्या महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी चे बचन दिले होते, ती वचनबद्धता पाळावी ह्याची जाणीव महायुती सरकारला करून देण्यासाठी एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणत्याही परिस्थितीत सरकारला करायला भाग पाडण्यासाठी राज्यभरात शिवसेना (उद्धव बाळासाहेष ठाकरे) पक्ष पुन्हा उन्हाच्या कडाक्यापेक्षाही जास्त तीव्रतेने तळपत असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मागणीच्या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून वाशिम जिल्ह्यात २ मे २०२५ रोजी शुक्रवारी सकाळी ९ वाजता वाशिम कृषी उत्पत्र बाजार समिती पासून हजारोच्या संकेत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरचा आतापर्यंतचे मोर्चाचे समस्त रेकॉर्ड तोडणारा महा विशाल मोर्चा निघणार असल्याची माहिती शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे. सदरहू मोर्चा वाशिम शहरातील प्रमुख मागनि जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या ट्रॅक्टर मोर्चाच्या जय्यत तयारीसाठी शिवसेनेचे वाशीम- यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख आणि येथील वाशीम जिल्हा संपर्कप्रमुख दिलीपराव जाधव यांचे नेतृत्वात वाशिम जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष युद्ध पातळीवर कामाला लागला असल्याचे चित्र दिसत असून ह्या मोर्चाला कर्जबाजारी शेतकऱ्यांचा भक्कम पाठिंबा मिळत आहे. महायुती सरकारने निवडणू‌क जाहीरनामा शेतक-यांना कर्जमाफी देण्याचे वचन दिले होते परंतु अजून पर्यंत ते कर्जमाफीचे वचन पूर्ण केले नाही. महायुती सरकारने महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा विश्वासघात केलेला आहे असे प्रतिपादन करून, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या न्याय मागणीसाठी शिवसेना (ऊबाठा) वाशिम जिल्ह्याच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या ट्रॅक्टर मोर्चात आपल्या ट्रैक्टरसह हजारो शेतकरी बांधवांनी सहभागी होण्याचे विनंती वजा आवाहन वाशीम जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. असे आवाहन आशिम जिल्हा संहपर्कप्रमुख डॉ. सुधीर कव्हर, वाशिम जिल्हा प्रमुख तथा वाशिम जिल्हा परिषदेचे अर्थ व चांधकाम सभापती सुरेश मापारी, जिल्हा संघटक गजाननराव देशमुख, यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघ संघटक कॅप्टन प्रशांत पाटील सुर्वे, माजी जिल्हाप्रमुख राजेश पाटील राऊत, ज्येष्ठ शिवसैनिक डॉ. सिद्धार्थ देवळे, युवासेना जिल्हाधिकारी नितीन मडके व जुबेर मोहनावाले, महिला आघाडी जिल्हा संघटिका मंगलाताई सरनाईक, युवती सेना जिल्हाधिकारी प्रिया महाजन, विधानसभा संपर्कप्रमुखांमध्ये वाशिमचे बालाजी वानखेडे, रिसोडचे विश्वनाथ सानप, मानोरा अनिल राठोड,, विधानसभा समन्वयकामध्ये रिसोड सुभाषराव बोरकर, अशोकराव अंभोरे,कारंजा गोपाल पाटील येवतकर, वाशिम रवी पाटील राऊत, विधानसभा संघटकामध्ये वाशिम पांडुरंग पांढरे,रिसोड मालेगाव दीपक दहात्रे, उपजिल्हाप्रमुख वाशीमचे निवासी उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, कारंजा दत्ता पाटील तुरक, मंगरूळपिर अनिल पाटील राऊत, रिसोडचे चंद्रशेखर देशमुख, तालुका प्रमुख वाशिम रामदास मते पाटील ,मंगरूळपीर रामदास पाटील सुर्वे, मालेगाव उद्धव पाटील गोडे, रिसोड नारायणराव आरु, मानोरा रवींद्र पवार, कारंजा विलास सुरळकर, शहर प्रमुख वाशिम गजाननराव भांदुर्गे, रिसोड संजय ईरतकर, मंगरूळपीर सचिन परळीकर, मानोरा संतोष पुरी, व गणेशराव वाबळे वाशिम शहर संघटक नामदेव हजारे, वाहतूक सेनेचे वाशिम जिल्हा प्रमुख गणेशअण्णा देशमुख

उपजिल्हाप्रमुख रामकृष्ण वानखेडे (माऊली), यांच्यासह शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी युवतीसेना व वाहतूक सेना समस्त आजी/ माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने सदरहू ट्रॅक्टर मोर्चामध्ये शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी व इतर न्याय मागण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आलें आहे या आंदोलनाची माहिती जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचे काम वाशिम जिल्ह्यातील समस्त शिवसैनिक युद्ध पातळीवर करीत आहेत त्यामुळे हा निघणारा ट्रॅक्टर मोर्चा वाशिम जिल्ह्यातील यापूर्वीचे समस्त आंदोलनाचे रेकॉर्ड मोडणारा मोर्चा असेल असे विश्वास उद्धव ठाकरे यांचे पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक यांना आहे. तरी या ट्रॅक्टर मोर्चामध्ये रिसोड तालुक्यातील सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक व तमाम शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन रिसोड शिवसेना तालुकाप्रमुख नारायणराव यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post