प्रतिनिधी अर्जुन शेळके-- शिरूर
शिरूर तालुका बांधकाम कामगार संघटनेच्या शिवसेना प्रणित शिरूर तालुका बांधकाम सेनाप्रमुख या पदावर श्री संदीप शेलार यांची नियुक्ती करण्यात आली शिरूर तालुक्यातील रिक्त जागेवरती महाराष्ट्राचे मा मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व पुणे जिल्हा बांधकाम कामगार सेना प्रमुख संतोष राजपूत यांच्या नियुक्तीने महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले व विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते व शिरूर महिला लोकसभा संपर्कप्रमुख सारिका पवार यांच्या मार्गदर्शना मध्ये ही नियुक्ती देण्यात आली
या निवडीच्या वेळेस श्री संदीप शेलार यांनी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे शिकवण यांचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करणार असल्याचे सांगितले या निवडीच्या वेळेस पुणे शिवसेनेतील सर्व संपर्कप्रमुख नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते
