रिसोड तालुक्यामध्ये श्री रेणुका माता कनिष्ठ महाविद्यालयाची 100% निकालाची परंपरा कायम
गोवर्धन- येथील श्री रेणुका माता कनिष्ठ महाविद्यालयाची सायन्स अँड कॉमर्स आपल्या यशाची परंपरा कायम राखत यंदाही १२वीच्या परीक्षेत १००% निकाल मिळवला आहे.
विज्ञान शाखा निकाल 100 टक्के निकाल खालील प्रमाणे
श्री रेणुका माता कनिष्ठ महाविद्यालय मधील 09 विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली असून,हे यश सलग अनेक वर्षांपासून टिकवले आहे.या वर्षी वाघ शिवतेज एकनाथ 82% गुणांसह महाविद्यालयामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.आदर्श मुरलीधर बांगर 81.17%
गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला असून, खरात कृष्णा गजानन 80.17% तिसरा क्रमांक मिळवला आहे. जयेश संतोष सोनुणे 78.83% यांनी चौथा क्रमांक मिळवला आहे
कला शाखा निकाल 96.42 टक्के निकाल खालील प्रमाणे
पहिला क्रमांक स्नेहल गजानन खिल्लारे 84.00
दुसरा क्रमांक देशमुख मोहित प्रमोद 74 .50
तिसरा क्रमांक वाघ सानिका नारायण 73.83.
चौथा क्रमांक कु-हे अयोध्या संजय 73.83
महाविद्यालयाचे प्राचार्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, "विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमांमुळे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाले आहे. आम्हाला अभिमान आहे की आमचे विद्यार्थी दरवर्षी उत्कृष्ट निकाल देत आहेत."
यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
महाविद्यालयाच्या या यशामुळे वाशिम जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा अधोरेखित झाला आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वत्र शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
